मुंबई. IPL 2027 Retention & Release List: आयपीएल 2027  (IPL 2027) च्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींनी आपल्या महागड्या आणि मोठ्या खेळाडूंना रिलीज करून चकित केले आहे. संघांनी आपली पर्स मजबूत करण्यासाठी अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) सर्वात मोठा निर्णय घेत वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाला (18 कोटी) रिलीज करून आपल्या बजेटमध्ये मोठी वाढ केली आहे. तर, व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे ऑस्ट्रेलियाचे दोन धुरंधर ट्रॅव्हिस हेड (SRH - 14 कोटी) आणि मिचेल स्टार्क (DC - 11.75 कोटी) हे देखील आगामी हंगामात दिसणार नाहीत, ज्यांना त्यांच्या संघांनी रिलीज केले आहे.

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) प्रशांत वीर (14.2 कोटी) आणि निवृत्ती घेतलेल्या एमएस धोनीला (4 कोटी) यादीतून बाहेर केले आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने (MI) आपल्या दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांची ट्रेंट बोल्ट (12.5 कोटी) आणि दीपक चहर (9.25 कोटी) यांची सुट्टी केली आहे.

याव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सने (RR) शिमरॉन हेटमायर (11 कोटी) आणि तुषार देशपांडे (6.5 कोटी) यांना रिलीज केले, तर लखनौच्या संघाने आवेश खान (9.75 कोटी) आणि आरसीबीने (RCB) जेकब बेथेल (2.6 कोटी) यांना बाहेर केले आहे. आता या मोठ्या नावांवर मिनी ऑक्शनमध्ये सर्वांच्या नजरा राहतील.

1. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)

रिटेन खेळाडू: ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, सरफराज खान, राहुल चहर, नूर अहमद, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हरटन, अकील होसेन, लियाम लिव्हिंगस्टोन (ट्रेड इन), जॅक एडवर्ड्स (ट्रेड इन). 

    रिलीज खेळाडू: एमएस धोनी, अमन खान, डियान फॉरेस्टर, कुलदीप यादव, मॅकनील नोरोन्हा, मॅथ्यू शॉर्ट, मॅट हेन्री, आकाश मधवाल, प्रशांत वीर, स्पेन्सर जॉन्सन, जॅक फॉल्क्स, खलील अहमद (ट्रेड आउट), नाथन एलिस (ट्रेड आउट).

    2. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

    रिटेन खेळाडू: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, नमन धीर, रायन रिकेल्टन, शेरफेन रदरफोर्ड, क्विंटन डी कॉक, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, राज बावा, मिचेल सँटनर, अश्विनी कुमार, रघू शर्मा, अर्शदीप सिंग (ट्रेड इन). 

    रिलीज खेळाडू: ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, एएम गझनफर, अथर्व अंकोलेकर, केशव महाराज, मोहम्मद इजहार, दानिश मालेवार, मयंक मार्कंडेय, मयंक रावत, महिपाल लोमरोर, रॉबिन मिंज, रुचित अहीर, कृष भगत, हार्दिक पांड्या (ट्रेड आउट).

    3. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

    रिटेन खेळाडू: अक्षर पटेल, केएल राहुल, पृथ्वी शॉ, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, मुकेश कुमार, औकिब नबी, विप्रज निगम, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, काइल जेमीसन, ऋषभ पंत (ट्रेड इन), झीशान अन्सारी (ट्रेड इन). 

    रिलीज खेळाडू: मिचेल स्टार्क, नितीश राणा, अभिषेक पोरेल, पथुम निसांका, बेन डकेट, करुण नायर, साहिल पारख, दुष्मंथा चमीरा, रेहान अहमद, अजय मंडल, टी नटराजन (ट्रेड आउट), कुलदीप यादव (ट्रेड आउट).

    4. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)

    रिटेन खेळाडू: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, जोश इंगलिस, आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, मोहसिन खान, मयंक यादव, आकाश सिंग, अर्जुन तेंडुलकर, कुलदीप यादव (ट्रेड इन), सॅम करन (ट्रेड इन). 

    रिलीज खेळाडू: आवेश खान, मॅथ्यू ब्रीट्झके, एनरिक नॉर्खिया, जॉर्ज लिंडे, वानिंदू हसरंगा, नमन तिवारी, अर्शिन कुलकर्णी, ऋषभ पंत (ट्रेड आउट), मोहम्मद शमी (ट्रेड आउट), एम सिद्धार्थ (ट्रेड आउट).

    5. पंजाब किंग्ज (Punjab Kings) रिटेन खेळाडू: श्रेयस अय्यर, प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, मुशीर खान, विष्णू विनोद, कूपर कोनोली, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह उमरझाई, मार्को जॅन्सन, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, बेन ड्वारशुइस, यश ठाकूर, वैशाख विजयकुमार, युझवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार, हरनूर सिंग, हार्दिक पांड्या (ट्रेड इन). रिलीज खेळाडू: नेहाल वढेरा, लॉकी फर्ग्युसन, मिचेल ओवेन, पाइला अविनाश, प्रवीण दुबे, विशाल निषाद, अर्शदीप सिंग (ट्रेड आउट).

    6. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

    रिटेन खेळाडू: रियान पराग, यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, अमन राव, लुआन ड्रे प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, दासुन शनाका, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, यश राज पुंजा, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा, सुशांत मिश्रा, मोहम्मद शमी (ट्रेड इन), एम सिद्धार्थ (ट्रेड इन). 

    रिलीज खेळाडू: शिमरॉन हेटमायर, ॲडम मिल्ने, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, कुलदीप सेन, युद्धवीर सिंग, विघ्नेश पुथुर, रवी सिंग, इमानजोत चहल, सॅम करन (ट्रेड आउट).

    7. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

    रिटेन खेळाडू: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ईशान किशन, सलिल अरोरा, अनिकेत वर्मा, आर स्मरण, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, ईशान मलिंगा, ब्रायडन कार्स, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, हर्ष दुबे, शिवांग कुमार, क्रॅन्स फुलेत्रा, टी नटराजन (ट्रेड इन), खलील अहमद (ट्रेड इन), नाथन एलिस (ट्रेड इन). 

    रिलीज खेळाडू: ट्रॅव्हिस हेड, कामिंदू मेंडिस, जयदेव उनाडकट, दिलशान मदुशंका, ओंकार तरमाले, अमित कुमार, शिवम मावी, गेराल्ड कोएत्झी, डेव्हिड पायने, आरएस अंबरीश, हर्षल पटेल (ट्रेड आउट), झीशान अन्सारी (ट्रेड आउट), लियाम लिव्हिंगस्टोन (ट्रेड आउट), जॅक एडवर्ड्स (ट्रेड आउट).

    8. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru)

    रिटेन खेळाडू: रजत पाटीदार, विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, अभिनंदन सिंग, रसिख सलाम, व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्तवाल, कनिष्क चौहान, यश दयाल. 

    रिलीज खेळाडू: जेकब बेथेल, रिचर्ड ग्लीसन, मंगेश यादव, सात्विक देसवाल, विहान मल्होत्रा, स्वप्नील सिंग.

    9. गुजरात टायटन्स (Gujarat Titans)

    रिटेन खेळाडू: शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, आर साई किशोर, मानव सुथार, रशीद खान, जयंत यादव, जेसन होल्डर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, अशोक शर्मा, अर्शद खान, पृथ्वी राज यार्रा, निशांत सिंधू, हर्षल पटेल (ट्रेड इन). 

    रिलीज खेळाडू: इशांत शर्मा, ल्यूक वूड, कुलवंत खेजरोलिया, शाहरुख खान, कॉनर एस्टरहुइझन.

    10. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders)

    रिटेन खेळाडू: कॅमेरून ग्रीन, सुनील नरेन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, फिन ॲलन, मनीष पांडे, रोव्हमन पॉवेल, अंगकृष रघुवंशी, रमणदीप सिंग, टिम सेफर्ट, सार्थक रंजन, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी. 

    रिलीज खेळाडू: अजिंक्य रहाणे, आकाश दीप, ब्लेसिंग मुझरबानी, दक्ष कामरा, लवनीत सिसोदिया, मथीशा पथिराना, मुस्तफिजुर रहमान, नवदीप सैनी, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, तेजस्वी सिंग, उमरान मलिक.