अहमदाबाद. IPL Final 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघाने रविवारी (31 मे) आयपीएल 2026 चे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावून इतिहास रचला. आरसीबीने 12 चेंडू शिल्लक असताना 5 गडी राखून गुजरातचा पराभव केला.

बंगळूरुची ही सलग दुसरी आयपीएल ट्रॉफी आहे. या विजयामुळे, सलग दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई (2019, 2020) आणि चेन्नई (2010, 2011) या संघांच्या पंक्तीत आरसीबीने संघाने स्थान मिळवले आहे. आयपीएल 2025 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने पटकावले, जे त्यांचे पहिले विजेतेपद होते.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली, विशेषतः रसिक सलाम दारने 3 बळी घेतले. यानंतर, चेस मास्टर विराट कोहलीने 42 चेंडूंमध्ये 75 धावांची शानदार खेळी करत संघाला दुसऱ्यांदा ट्रॉफी मिळवून दिली. विशेष म्हणजे कोहलीने षटकार मारून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. विराट शेवटपर्यंत नाबाद राहिला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने गुजरात टायटन्सविरुद्धचा अंतिम सामना 5 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 8 गडी गमावून 155 धावा केल्या आणि बंगळूरसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले. विराट कोहलीच्या नाबाद 75 धावांच्या जोरावर आरसीबीने 18 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. या विजयासह त्यांनी सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली.

156 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. व्यंकटेश अय्यर 16 चेंडूंमध्ये 32 धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर रबाडाकरवी झेलबाद झाला.  त्यानंतर देवदत्त पडिक्कलने फक्त एक धाव काढली आणि कागिसो रबाडाने त्याला बाद केले, आयपीएलमधील ही त्याची 29 वी विकेट होती. आरसीबीने 89 धावांवर रजत पाटीदारच्या (15) रूपाने तिसरी विकेट गमावली, ज्याला रशीद खानने त्याच्या पहिल्याच षटकात बाद केले. यानंतर, त्याच षटकात त्याने कृणाल पांड्याला बाद करून आरसीबीला चौथा धक्का दिला आणि गुजरातच्या आशा जिवंत ठेवली..

मात्र, विराट कोहली एका बाजूला ठाम राहिला आणि 25 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. विराटचे हे सर्वात जलद आयपीएल अर्धशतक होते. जेव्हा आरसीबी लक्ष्याच्या जवळ होती, तेव्हा टीम डेव्हिड (24) अर्शद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. डेव्हिड बाद झाल्याने आरसीबीची धावसंख्या 132/5 झाली. मात्र, जितेश शर्मा (11 नाबाद) आणि विराट कोहली (75 नाबाद) यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला.  रशीद खान गुजरातसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 2 बळी घेतले.

    आयपीएलमधील कोहलीचे सर्वात जलद अर्धशतक (चेंडूंच्या संख्येनुसार)

    25 vs GT, अहमदाबाद, 2026

    26 vs RR, बेंगळुरु, 2018

    6 vs DC, दिल्ली, 2018

    27 vs LSG, लखनऊ, 2025

    आयपीएल फायनलमधील सर्वात जलद अर्धशतक (चेंडूंच्या संख्येनुसार)

    24 - सुरेश रैना (CSK) विरुद्ध MI, मुंबई DYP, 2010

    24 - डेविड वॉर्नर (SRH) vs RCB, बेंगळुरु, 2016

    24 - वेंकटेश अय्यर (KKR) vs SRH, चेन्नई, 2024

    25 - रोहित शर्मा (MI) vs CSK, कोलकाता, 2015

    25 - क्रिस गेल (RCB) vs SRH, बेंगळुरु, 2016

    25 - विराट कोहली (RCB) vs GT, अहमदाबाद, 2026

    गुजरातची फलंदाजी ढेपाळली -

    आयपीएलच्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर  गुजरात संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. गुजरातकडून फक्त वॉशिंग्टन सुंदरने (50 नाबाद) टिकून फलंदाजी केली.  गुजरातची सुरुवात खराब झाली कारण कर्णधार शुभमन गिल (10) संघाच्या 22 धावांवर बाद झाला आणि जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारने त्याचा झेल घेतला, ज्यामुळे गुजरातची पहिली विकेट पडली. साई सुदर्शन (12) देखील 26 धावांवर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला.

    यानंतर निशांत सिंधू आला आणि चांगला खेळत होता, पण 20 धावांवर असताना तोही रसिक सलाम दारच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कलकरवी झेलबाद झाला. सिंधू बाद झाल्याने गुजरातची धावसंख्या 55/3 झाली.  गुजरातने 73 धावांवर जोस बटलरच्या (१९) रूपाने चौथी विकेट गमावली. 6 चेंडूंमध्ये 15 धावा करून  अर्शद खानने पाचवी विकेट घेतली. अर्शद बाद झाल्याने गुजरातची धावसंख्या ९९/५ झाली. यानंतर राहुल तेवतियादेखील 7 धावा करून बाद झाला. गुजरात संघाची सहावी विकेट कोण होती? सात धावा केल्यानंतर भुवनेश्वर कुमारने जेसन होल्डरला बाद केले. अशाप्रकारे भुवनेश्वरने यंदाच्या आयपीएलमध्ये आपले 28 बळी पूर्ण केले. गुजरातकडून बाद होणारा शेवटचा फलंदाज रशीद खान होता, त्याने 7 धावा केल्या.

    रसिक सलाम दार आरसीबीसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 3 बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. कृणाल पांड्याला एक विकेट मिळाली.

    आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बंगळूरला सामना जिंकण्यासाठी 156 धावांचे लक्ष्य मिळाले होते. वॉशिंग्टन सुंदरने गुजरातसाठी एकट्याने झुंज देत 37 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावांची खेळी केली.