जेएनएन. नवी दिल्ली. Virat Kohli announces Test retirement: भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) यांने चाहत्यांना एक धक्का दिला आहे. विराट कोहलीने कसोटी निवृत्तीची घोषणा केली आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टेस्ट किक्रेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 

विराट कोहलीची कसोटीमधील कामगिरी (Virat Kohli Test Career)

विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यांमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतकांसह 9230 धावा केल्या. त्याने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले होते.

विराट कोहलीचे कसोटीमधील क्रिकेट रेकॉर्ड 

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याचे काही प्रमुख कसोटी रेकॉर्ड्स खालीलप्रमाणे आहेत:

  • खेळलेले सामने: 123 कसोटी सामने
  • केलेल्या धावा: 9230 धावा
  • सर्वोच्च धावसंख्या: 254* (नाबाद)
  • फलंदाजीची सरासरी: 46.85
  • शतके: 30
  • अर्धशतके: 31
  • द्विशतके: 7(भारतासाठी सर्वाधिक)
  • भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू: 68 सामने
  • भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय: 40 विजय
  • कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके: 20 शतके

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा केला असून अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.