नवी दिल्ली. IND U19 vs PAK U19 Live Streaming: अंडर 19 आशिया कप 2026 च्या 8 व्या सामन्यात इंडिया अंडर 19संघाचा सामना पाकिस्तान अंडर 19 संघा सोबत होईल. हा भारताचा या हंगामातील दुसरा सामना असेल आणि भारतीय संघ आपला विजयक्रम कायम राखण्याच्या इराद्याने मेदानात उतरणार आहे. भारताने याआधी नेपाळला आपल्या पहिल्याच लीग सामन्यात 10 विकेट्सने हरवले होते आणि आता भारताची नजर पाकिस्तानला हरवण्यावर असेल. पाकिस्तानचा देखील हा दुसरा लीग सामना असेल.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ विजयासाठी झुंजणार असून दोन्ही संघातील हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. भारताने पहिला सामना जिंकून 2 गुण मिळवले होते आणि गट अ च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला होता. पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताचे 4 गुण होतील आणि गुणतालिकेत टीम इंडियाची स्थिती अधिक मजबूत होईल सोबतच पुढच्या फेरीत जाण्याचा मार्ग देखील उघडेल.
वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांच्या खेळीवर नजरा -
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप सामन्यात प्रत्येकाची नजर वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांवर—आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड यांच्यावर राहणार आहे. आर्यवीरने तर नेपाळविरुद्ध झालेल्या पहिल्या अंडर-19आशिया कप लढतीत वादळी अर्धशतक ठोकून धुमाकूळ घातला होता. आज देखील सेहवागच्या बॅटमधून पाकिस्तानविरुद्ध अशाच धमाकेदार खेळीची अपेक्षा राहील. भारतीय संघ येथे नेपाळला 10 विकेट्सने चिरडून पोहोचला आहे, तर पाकिस्तानने यजमान युएईला 9 विकेट्सने चारीमुड्या चीत केले आहे. आजचा सामना जिंकणारा संघ टॉप-2 मध्ये आपली जागा पक्की करून उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकू शकतो.या सामन्याला तुम्ही कशा प्रकारे थेट पाहू शकता याबद्दल जाणून घेऊया.
भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर19 सामना कधी खेळवला जाईल?
भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर19 सामना 8 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) खेळवला जाईल.
भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर19 सामना कुठे खेळवला जाईल?
भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर19 सामना अल अमिरात क्रिकेट ग्राउंड, ओमान येथे खेळवला जाईल.
i
टीव्हीवर भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर19 सामना कसा पाहावा?
भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर19 सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.
भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर19 सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
भारत अंडर19 विरुद्ध पाकिस्तान अंडर१९ सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह (SonyLIV) ॲप आणि वेबसाईटवर उपलब्ध असेल.
भारताचा अंडर19 संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, यशवर्धन सिंह चौहान (उप-कर्णधार), कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), रजत बघेल (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, आर्यन सवासानी, मोहित उलवा, काव्या पटेल, शविन विनोद, इशान सूद.
पाकिस्तानचा अंडर19 संघ: फरहान युसूफ (कर्णधार), अब्दुल कादिर (यष्टीरक्षक), अब्दुल सुभान, अहमद हुसेन, अली रझा, हमजा जहूर (यष्टीरक्षक), हसनैन अब्बास दार, हयाम खान, हुजैफा अहसन, जहांगीर बिलाल, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद सेयम, नकाब शफिक, रिझवानुल्लाह, उस्मान खान.
