अहमदाबाद. Ind vs NZ Final, T20 World Cup Live: भारताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इतिहास रचला असून सलग दुसऱ्यादा विजेतेपद जिंकले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताच्या सर्वच फलंदाजांनी स्फोटक खेळी करत न्यूझीलंडसमोर 256 धावांचा डोंगर उभा केला. फलंदाजांनी आपले काम केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही आपली मोहिम फत्ते करत किवी संघाचा आमसान दाखवले.
जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव 159 धावांवरच आटोपला आणि भारताने 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक पटकावले.
सॅमसन-अभिषेक-ईशानचं वादळ
तत्पूर्वी फलंदाजी करताना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी वादळी खेळ्या केल्या. टीम इंडियाने 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली. एकवेळी भारतीय संघ 270 धावांपर्यंत जाईल असे वाटत असताना 16 व्या षटकात भारताला एकापाठोपाठ 3 धक्के बसले. सलामीवीर संजू सॅमसन, अभिषेक शर्मानंतर इशान किशननेही अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकात शिवम दुबेने २४ धावांची खेळी करत भारताची धावसंख्या 250 पार पोहोचवली. संजू सॅमसनने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 46 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांसह 89 धावांची खेळी उभारली. संजू सॅमसननं अभिषेक शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 98 धावांची आणि ईशान किशनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली..
- 2026-03-08 22:50:00
India vs New Zealand Final Live Score: मिशेल सँटनर बाद, भारत विजयापासून 1 विकेट दूर
न्यूझीलंडला अंतिम सामन्यात नववा झटका बसला. जसप्रीत बुमराहने मिचेल सँटनरला बाद केले. सँटनरने 35 चेंडूत 43 धावा केल्या. बुमराहने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 15 धावा दिल्या आणि चार विकेट घेतल्या. 18 षटकांनंतर, किवी संघाची धावसंख्या 9 बाद 154 आहे. - 2026-03-08 22:30:00
IND vs NZ Final LIVE Score: जेम्स नीशम बाद
न्यूझीलंडला अंतिम सामन्यात सातवा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने फलंदाजाला 7 धावांवर बाद केले. यासह, भारतीय संघ विजयाच्या मार्गावर आहे. - 2026-03-08 21:50:00
IND vs NZ Final LIVE Score: 14 षटकानंतर 6 बाद 134
न्यूझीलंडच्या डावातील 14 षटके संपली आहेत. किवीज संघाने 6 गडी गमावून 134 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्याने 14 वे षटक टाकले आणि 6 धावा दिल्या. किवीज संघाकडून कर्णधार मिशेल सँटनर 34 धावांवर फलंदाजी करत आहे, तर जेम्स नीशम 6 धावांवर फलंदाजी करत आहे. - 2026-03-08 21:40:00
IND vs NZ Live Update: ग्लेन फिलिप्स आउट
भारतीय उपकर्णधार अक्षर पटेलने फायनल मुकाबल्यात तिसरे यश मिळवून दिले आहे. अक्षरने ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. या षटकात त्याने एकूण 11 धावा दिल्या मात्र बापूने षटकांच्या पाचव्या चेंडूवर फिलिप्सचे विकेट मिळवले. 5 षटकानंतर किवींचा स्कोअर 47/3 आहे. - 2026-03-08 21:30:00
T20 world cup 2026 Final, India vs New Zealand LIVE Score: किवींना पहिला धक्का, फिन अॅलन बाद
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने पहिले यश मिळवले आहे. अक्षर पटेलने फिन अॅलनला बाद केले. अॅलन 7 चेंडूत 9 धावा काढल्यानंतर बाद झाला. किवीजकडून टिम सेफर्ट 21 धावांवर नाबाद आहे, तर रचिन रवींद्र फलंदाजीसाठी आला आहे. 3 षटकांनंतर न्यूझीलंडचा स्कोअर 32/1 आहे. - 2026-03-08 21:20:00
IND vs NZ Final LIVE Score: क्रीजवर सलामी जोडी
भारताच्या 255 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने फलंदाजी सुरू केली आहे. सलामीवीर टिम सेफर्ट आणि फिन अॅलन फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. भारताकडून अर्शदीप सिंग पहिले षटक टाकत आहे. - 2026-03-08 20:40:00
IND vs NZ Final LIVE Score: भारताच्या 255 धावा, किंवींसमोर मोठे आव्हान
भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्यात 255 धावांचा डोंगर रचला आहे. टीम इंडियाकडून संजू सॅमसन 89, अभिषेक शर्मा 52, ईशान किशन 54, हार्दिक पांड्या 18, तिलक वर्मा 8* आणि शिवम दुबे याने नाबाद 26 धावा केल्या. किवींसमोर विजयासाठी 256 धावांचे आव्हान आहे. न्यूझीलंडमधून जेम्स नीशम याने 3, तर रचिन रविंद्र आणि मॅट हेनरी यांनी एक-एक विकेट घेतल्या. - 2026-03-08 20:36:00
IND vs NZ Final LIVE Score: भारताने एका षटकात 3 विकेट गमावल्या
न्यूझीलंडकडून 16 वे षटक टाकण्यासाठी जेम्स नीशम आला. त्याने या षटकात तीन धक्के दिले, प्रथम संजू सॅमसन आणि नंतर इशान किशनला बाद केले. किशनने 25 चेंडूत 54 धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादव एकही धाव न घेता बाद झाला. या षटकात नीशमने एक धाव दिली आणि तीन विकेट घेतल्या. 16 षटकांनंतर भारताची धावसंख्या 204/4 होती. - 2026-03-08 20:30:00
India vs New Zealand Final Live Score: संजू सॅमसन बाद
India vs New Zealand Final Live Score: संजू सॅमसन बाद न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात संजू सॅमसन 46 चेंडूत 81 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. जेम्स नीशमने संजू सॅमसनला बाद केले. संजू नंतर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला. - 2026-03-08 20:05:00
IND vs NZ Final T20 World Cup 2026: संजू सॅमसनचे अर्धशतक
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने 33 चेंडूत अर्धशतक ठोकले. सॅमसनचे टी20 वर्ल्ड कपमधील सलग तिसरे अर्धशतक आहे. टीम इंडियाचा स्कोअर 11षटकात 137/1 आहे. - 2026-03-08 20:00:00
IND vs NZ Final T20 World Cup 2026: 10 षटकात 127 धावा
भारताच्या जावातील 10 षटके संपली आहेत. टीम इंडियाने 10 षटकानंतर एक विकेट गमावून 127 धावा केल्या आहेत. 10व्या षटके जेम्स नीशमने गोलंदाजी केली या षटकात भारताने 12 धावा केल्या. - 2026-03-08 19:40:00
T20 world cup 2026 Final, India vs New Zealand LIVE Score: अभिषेक शर्माचे अर्धशतक
न्यूझीलंडविरुद्ध फायनल सामन्यात अभिषेक शर्मा नावाचे तुफान आले आहं. अभिषेक टूर्नामेंटमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करत होता मात्र फायनलमध्ये त्याने 18 चेंडूत अर्धशतक लगावले आहे. अभिषेकने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार खेचले. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या आहेत. अभिषेक 51 धावांवर नाबाद आहे तर संजू सॅमसन 33 धावांवर खेळत आहे. - 2026-03-08 19:30:00
India vs New Zealand Final Live Score: अभिषेक -संजूची स्फोटक सलामी, भारताची धावसंख्या बिनबाद ५० पार
पाच षटकात 72 धावा केल्या आहेत. पाचव्या षटकानंतर अभिषेक ३१ तर संजू ३३ धावांवर खेळत आहेत. भारताने 4 षटकात 50 धावा पूर्ण केल्या. - 2026-03-08 18:00:00
India vs New Zealand Final Live Score: रिकी मार्टिन व सुखबीर सिंहचा परफॉर्म
टी20 वर्ल्ड कप 2026 फायनलची क्लोजिंग सेरेमनीत प्यूट्रो रिकोचा पॉप स्टार रिकी मार्टिनने परफॉर्म केला. त्याच्याआधी पंजाबी सिंगर सुखबीर सिंग यांनी सादरीकरण केले.THE ATMOSPHERE AT NARENDRA MODI STADIUM 🥶🔥 pic.twitter.com/ecBUqKuKHv
— Johns. (@CricCrazyJohns) March 8, 2026 - 2026-03-08 16:00:00
IND vs NZ Live: T20 विश्वचषकात भारताविरुद्ध न्यूझीलंडचा जबरदस्त रेकॉर्ड .
टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडचा भारताविरुद्ध 3-0 असा विक्रम आहे. ब्लॅक कॅप्सने 2007 मध्ये जोहान्सबर्ग, 2016 मध्ये नागपूर आणि 2021 मध्ये दुबईमध्ये भारताचा पराभव केला होता. त्यामुळे, पुरुषांच्या टी-20 विश्वचषकात भारताला अद्याप न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही. - 2026-03-08 15:30:00
IND vs NZ Live Score: हॉटेलमधून स्टेडियमकडे रवाना झाली टीम इंडिया
#WATCH | Gujarat: Team India leaves from their hotel in Ahmedabad for Narendra Modi Stadium where they will face New Zealand in #ICCT20WorldCupfinal this evening. pic.twitter.com/X2sjnwXyTb
— ANI (@ANI) March 8, 2026 - 2026-03-08 15:15:00
Ind vs Nz Final LIVE: अहमदाबाद;च्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर चाहत्यांचा जल्लोष जोश
VIDEO | Fans from different part of the country started to flock at the Narendra Modi Stadium, hours prior to the first ball being bowled of the T20 World Cup final between India and New Zealand.
— Press Trust of India (@PTI_News) March 8, 2026
(Full video available on https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/wrOtF4h4BC - 2026-03-08 15:00:00
IND vs NZ Live Score: : भारताचा सामना करण्याबद्दल मिचेल सँटनर काय म्हणाला?
"अर्थात, सर्वप्रथम, मला या गटाचा खूप अभिमान आहे," सँटनर म्हणाला. "आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत आणि मला त्यांचा इतका मोठा अभिमान आहे की संघाने हे यश मिळवले आहे." तो पुढे म्हणाला, "अंतिम फेरीसाठी आम्ही अंदर डॉग्ज आहोत, असे म्हणणे योग्य आहे, परंतु त्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमचे काम भारतावर शक्य तितके दबाव आणण्याचा प्रयत्न करणे आणि काय होते ते पाहणे आहे." - 2026-03-08 14:50:00
IND vs NZ Live: कोण सादरीकरण करेल आणि क्लोजिंग सेरेमनी कधी सुरू होईल?
भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:30 वाजता सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक फायनलच्या समारोप समारंभात जागतिक पॉप स्टार रिकी मार्टिन सादरीकरण करतील. संगीत क्षेत्रातील दिग्गज सुखबीर आणि फाल्गुनी पाठक हे देखील सादरीकरण करतील. - 2026-03-08 14:45:00
India vs New Zealand Live: 2023 चा हिशोब चुकता करण्यासाठी उतरणार टीम इंडिया
आज, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये निळ्या जर्सी घातलेले भारतीय चाहते त्यांच्या संघाला पाठिंबा देताना दिसतील. हे तेच ठिकाण आहे जिथे सलग विजयानंतर भारताला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामना 6 विकेट्सने हरवला होता. आता, 840 दिवसांनंतर, भारतीय संघ पुन्हा एकदा त्याच स्टेडियमवर अंतिम सामना खेळणार आहे. पण यावेळी, हा एकदिवसीय सामना नाही, तर टी20 विश्वचषक आहे आणि त्यांचा सामना न्यूझीलंडशी आहे. - 2026-03-08 14:40:00
IND vs NZ Final: T20 World Cup 2026 चा Closing Ceremony? कधी होईल?
टी२० विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वीचा समारोप समारंभ संध्याकाळी 5:30 PM वाजता सुरू होईल, ज्यामध्ये रिकी मार्टिनचा हाय-ऑक्टेन परफॉर्मन्स आणि 2,000 ड्रोनचा शो असेल. टॉस संध्याकाळी 6:30 PM वाजता होईल आणि सामना संध्याकाळी 7:00 PM वाजता सुरू होईल. सामना अधिकारी: - मैदानावरील पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि अॅलेक्स व्हार्फ (इंग्लंड) - थर्ड अंपायर (टीव्ही): अल्लाउद्दीन पालेकर (दक्षिण आफ्रिका) - चौथे पंच: एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) - सामनाधिकारी: अँडी पायक्रॉफ्ट (झिम्बाब्वे) - 2026-03-08 14:35:00
IND vs NZ Live Score: हरभजन सिंगने टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा
#WATCH | Mumbai, Maharashtra: On ICC T20 Men’s World Cup Final: India Vs New Zealand, Former Indian cricketer, Harbhajan Singh says, "... My best wishes to Team India. Today is the final, and they must perform like champions. Team India is unstoppable once they set their minds to… pic.twitter.com/dDDCdtrh7i
— ANI (@ANI) March 8, 2026 - 2026-03-08 16:10:00
T20 World Cup Final: अहमदाबादमध्ये हॉटेलचे भाडे तब्बल 400 टक्क्यांनी वाढले
IND vs NZ Final Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यामुळे अहमदाबादच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. हॉटेलच्या खोल्या 300-400 टक्क्यांनी महागल्या आहेत, तर विमान भाडेही गगनाला भिडले आहे. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते शहरात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या खोल्या पूर्वी 5 हजार ते 20 हजार रुपयांना मिळत होत्या, त्यांचे भाडे आता 15,000 ते 50,000 रुपयांपर्यंत वाढले आहे. अंतिम फेरीमुळे, विमान प्रवासाच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. मुंबई ते अहमदाबाद विमान प्रवास, जो साधारणपणे 3 ते 4 हजार रुपयांना मिळत होता, तो आता १५ ते १७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. दिल्ली ते अहमदाबादचे भाडे सुमारे 14 हजार रुपये झाले आहे. बेंगळुरूहून अहमदाबादला जाण्यासाठी सुमारे 13 हजार रुपये मोजावे लागत आहेत. क्रिकेटप्रेमींची गर्दी लक्षात घेता, दिल्लीहून अहमदाबादसाठी एक तर मुंबईहून अहमदाबादसाठी 2 विशेष ट्रेनही चालवण्यात आल्या आहेत. - 2026-03-08 14:30:00
Ind vs NZ T20 Final: भारताचे सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवू शकतात न्यूझीलंडचे ‘हे’ 5 खेळाडू
2026 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पाच किवी खेळाडू भारताच्या चॅम्पियन होण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. यामध्ये फिन ॲलन, टिम सिफर्ट, डॅरिल मिशेल, लॉकी फर्ग्युसन आणि मिशेल सँटनर यांचा समावेश आहे. - 2026-03-08 14:25:00
India vs New Zealand Final Live Cricket Score: आज अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल?
AccuWeather अॅपनुसार, आज सकाळी तापमान 34 अंश सेल्सिअस होते आणि दुपारी ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, तर संध्याकाळी ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. पावसाची शक्यता नाही. - 2026-03-08 14:20:00
IND vs NZ Final Live Score: T20 विश्वचषक विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी एकूण 13.5 दशलक्ष डॉलर्स ( 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे, जी 2024च्या आवृत्तीपेक्षा जवळजवळ 20 टक्के जास्त आहे. ट्रॉफी विजेता संघ – अंदाजे 27.48 कोटी रुपये उपविजेता संघ – अंदाजे 14.65 कोटी रुपये उपांत्य फेरीतील पराभूत संघ (दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड) – अंदाजे 7.24 कोटी रुपये सुपर ८ मधील पराभूत संघ - अंदाजे 3.48 कोटी रुपये - 2026-03-08 14:15:00
IND vs NZ Live Score: जर भारताने जेतेपद जिंकले तर तीन मोठे पराक्रम होतील
जर भारतीय संघ आज न्यूझीलंडला हरवण्यात यशस्वी झाला तर तीन मोठ्या कामगिरी होतील. पहिले म्हणजे, भारत सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनेल. शिवाय, कोणत्याही संघाने आतापर्यंत तीन टी-२० विश्वचषक जिंकलेले नाहीत. शिवाय, भारतीय संघाने घरच्या मैदानावर कधीही टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. - 2026-03-08 14:10:00
IND vs NZ Final Live: ड-टू-हेड रेकॉर्ड
भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 16 सामने भारतीय संघाने जिंकले आहेत, तर 11 सामने किवी संघाने जिंकले आहेत. तथापि, टी-20 विश्वचषकाचा इतिहास बदलत आहे. आतापर्यंत विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये 3 सामने झाले आहेत आणि तिन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. - 2026-03-08 14:05:00
IND vs NZ Final Live: इतिहास रचण्यासाठी भारताला सावधगिरी बाळगावी लागेल
भारतीय संघ टी-20 विश्वचषकात इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर आहे आणि ही तफावत भरून काढण्यासाठी, गेल्या काही सामन्यांमधील कमकुवतपणा दूर करणे आवश्यक आहे. प्रथम, सलामीची समस्या सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. न्यूझीलंडची सलामी जोडी भारतासाठी मोठा धोका निर्माण करू शकते. डेथ ओव्हर्ससाठी योग्य रणनीती अत्यंत महत्त्वाची आहे. भारताला त्यांचा फिरकी खेळ सुधारण्याची आवश्यकता आहे. - 2026-03-08 14:00:00
IND v NZ Live Score: अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था
अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदाबाद शहर पोलिस आयुक्त (जेसीपी) यांच्या मते, सामन्यादरम्यान सुरक्षा राखण्यासाठी 2,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. - 2026-03-08 13:58:00
India vs New Zealand LIVE Cricket Score: फायनलआधी काय म्हणाले कुलदीपचे बालपणीचे कोच?
#WATCH | Kanpur, Uttar Pradesh: On India vs New Zealand final match in #ICCT20WorldCup, cricketer Kuldeep Yadav's childhood coach, Kapil Pandey, says, "...It's a big ground. All our batsmen will have to play cautiously and score big, as they did against England. I want Abhishek… pic.twitter.com/j2Ur9y8N0q
— ANI (@ANI) March 8, 2026 - 2026-03-08 13:55:00
India vs New Zealand Final LIVE: भारत-न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग-11
भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह. न्यूझीलंड- टिम सिफर्ट (विकेटकीपर), फिन एलेन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डेरिल मिचेल, जेम्स नीशम/जैकब डफी, मिचेल सैंटनर (कप्तान), कोल मैककोंची, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन. - 2026-03-08 00:00:00
IND vs NZ Final Live: वरुण चक्रवर्तीचा पत्त कट ?
न्यूझीलंड विरुद्ध फायनलआधी भारतीय टीम इंडियासाठी दोन अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. आयसीसी टी20 रँकिंगमधील नंबर 1 बॅटर अभिषेक शर्मा आणि नंबर-1 बॉलर वरुण चक्रवर्ती खराब फॉर्मचा सामना करत आहे. दरम्यान अभिषेकला फायनल खेळण्याची संधी मिळू शकते मात्र वरुण चक्रवर्तीचा पत्ता कट होऊ शकतो. वरुणच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. मात्र हे सामन्याआधीच निश्चित होऊ शकते. ICC Men's T20 World Cup 2026 Final Live Score: धोनी अहमदाबादेत दाखल
#WATCH | Gujarat | Former Captain of the Indian Cricket Team Mahendra Singh Dhoni arrives at Ahmedabad
— ANI (@ANI) March 8, 2026
ICC Men's T20 World Cup 2026 final between India and New Zealand, to be played today at the Narendra Modi Stadium. pic.twitter.com/5Q6gNuIcsQ- 2026-03-08 12:22:00
टीम इंडियाला टाळाव्या लागतील ‘या’ 3 मोठ्या चुका
IND vs NZ: भारताने 'या' ३ मोठ्या चुका टाळायला हव्या 1. फलंदाजीच्या क्रमात छेडछाड नको- 2. फिरकीच्या जाळ्यात अडकणे 3. अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो- - 2026-03-08 12:20:00
IND vs NZ: ICC Men's T20 World Cup विजेत्यांची संपूर्ण यादी
2007– भारताने दक्षिण आफ्रिकेत पहिला टी20 विश्वचषक जिंकला. 2009 - पाकिस्तानने इंग्लंडमध्ये विजेतेपद जिंकले. 2010 - इंग्लंडने वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक जिंकला. 2012 - वेस्ट इंडिजने श्रीलंकेत विजेतेपद जिंकले. 2014- श्रीलंकेने बांगलादेशमध्ये विजेतेपद जिंकले. 2016 - वेस्ट इंडिजने भारतात त्यांचा दुसरा टी20 विश्वचषक जिंकला. 2021- ऑस्ट्रेलियाने ओमान आणि यूएईमध्ये विजेतेपद जिंकले. 2022 - इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये विजेतेपद जिंकले. 2024- भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजेतेपद जिंकले. - 2026-03-08 12:15:00
ind vs Nz Live Score: आज History Repeat, History Defeat दिवस -
आजचा दिवस भारत आणि न्यूझीलंड संघांसाठी खूप खास आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत न्यूझीलंडचा सामना करणार आहे. टीम इंडियाकडे किवींना हरवून 'History Repeat, History Defeat''' करण्याची संधी आहे. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे भारतीय संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या विजयाची पुनरावृत्ती करू इच्छितो, तर इतिहासाचा पराभव म्हणजे इतिहासात अजूनही टिकून असलेले जुने विक्रम मोडणे. आजपर्यंत, टीम इंडिया टी-20 विश्वचषकात किवींना हरवू शकलेली नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्याकडे इतिहास बदलण्याची आणि किवींचे वर्चस्व मोडण्याची संधी आहे. - 2026-03-08 12:12:00
India V New Zealand LIVE: किवी संघाचे वर्चस्व
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा इतिहास बराच मोठा आहे, परंतु या स्पर्धेत टीम इंडियाला अद्याप किवी संघाला हरवता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पहिला पराभव 2007 च्या टी-20 विश्वचषकात झाला होता, जिथे भारत 191 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला होता. तथापि, हा एक चांगला विक्रम आहे की त्या पराभवानंतरही, भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विश्वचषक विजेतेपद जिंकले. - 2026-03-08 00:00:00
IND v NZ Final LIVE Score: अहमदाबादची खेळपट्टी कशी असेल?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रात्री दव पडल्यामुळे नाणेफेक महत्त्वाची असेल. नाणेफेक जिंकणारा संघ कदाचित प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. हा सामना काळ्या आणि लाल मातीच्या मिश्रणाच्या खेळपट्टीवर खेळला जाईल, ज्यामुळे फिरकीपटूंना कमी मदत मिळेल. येथे फलंदाजांचे वर्चस्व असू शकते. येथील संथ काळ्या मातीच्या खेळपट्टीवर भारतीय संघ 2023 मध्ये पराभूत झाला होता. - 2026-03-08 12:05:00
IND vs NZ Final LIVE Cricket Score: अंतिम सामन्याचे डिटेल
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. टॉस संध्याकाळी 6:30 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. चाहते जिओ-हॉटस्टार अॅपवर देखील सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. - 2026-03-08 11:50:00
India vs New Zealand Live Score: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना
आज संध्याकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. भारतीय संघ सध्या टी-२० विश्वचषक विजेतेपद राखण्यासाठी फेव्हरिट मानला जात आहे. दरम्यान, न्यूझीलंड, नेहमीप्रमाणे, अजूनही अंडरडॉग आहे. ब्लॅक कॅप्स अखेर 21 व्या शतकात त्यांचे पहिले व्हाईट-बॉल विजेतेपद जिंकतील का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
