नवी दिल्ली.  India vs West Indies 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारी अरुण जेटली स्टेडियमवर सुरू झाला. पहिला दिवस भारतीय फलंदाजांचा, विशेषतः यशस्वी जयस्वालचा होता, जो 173 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस भारताने दोन विकेट गमावून ३१८ धावा केल्या होत्या. कर्णधार गिल 20 धावांवर नाबाद राहिला.

अहमदाबादमधील पहिला कसोटी सामना भारताने एकतर्फी  जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघाने विजयी लय कायम ठेवली आहे. वेस्ट इंडिजचा उद्देश मालिका बरोबरीत सोडण्याचा आहे, मात्र हे त्याच्या त्यांच्यासाठी सोपे काम नाही. पहिल्या कसोटीतच वेस्ट इंडिज संघाचा कमकुवतपणा स्पष्टपणे दिसून आला. त्यामुळे भारताचा वरचष्मा आहे.

पहिला दिवस भारताच्या नावावर -

दिल्ली कसोटीचा पहिला दिवस भारताचा होता आणि जयस्वालने 173 धावांची नाबाद खेळी केली आणि उद्या द्विशतकाचे लक्ष्य ठेवले जाईल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि के.एल. राहुल बाद झाल्यानंतर, जयस्वालने साई सुदर्शनसह भारताला मजबूत स्थितीत आणले. साई सुदर्शन देखील शतकाच्या मार्गावर होता परंतु पहिल्या दिवशी विकेट घेणारा एकमेव गोलंदाज जोमेल वॉरिकनने 87 धावांवर त्याला बाद केले.  साई सुदर्शननंतर, भारतीय कर्णधार शुभमन गिलने दिवसाच्या खेळाच्या शेवटपर्यंत जयस्वालला साथ दिली आणि तोही नाबाद परतला. जेडेन सील्सनेही चांगली गोलंदाजी केली पण त्याला विकेट घेता आली नाही. सुरुवातीच्या तासात कसून गोलंदाजी केल्यानंतर, वेस्ट इंडिजने शेवटच्या सत्रात शिस्तबद्ध गोलंदाजी केली. तथापि, या सामन्यात भारत मजबूत स्थितीत आहे, संघात भरपूर फलंदाजी शिल्लक आहे. उद्याचा खेळ जयस्वाल द्विशतक झळकावेल की नाही या प्रश्नाने सुरू होईल.

भारताचा स्कोअर 300 च्या पुढे -

यशस्वीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला 300 चा टप्पा ओलांडता आला आहे. यशस्वी सध्या द्विशतकावर लक्ष ठेवून आहे.

    सचिन, डॉन ब्रॅडमनच्या पंक्तीत जैयस्वाल - 

    यशस्वीने कसोटीतील त्याचे सातवे शतक पूर्ण करताना अनेक विक्रम मोडले. सर डॉन ब्रॅडमन ( 12 ), सचिन तेंडुलकर ( 11 ) व सर गॅरी सोबर्स ( 9) यांच्यानंतर 23 व्या वर्षी सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणाऱ्यांमध्ये यशस्वीचे ( 7) नाव आले आहे. दीडशेच्या पुढे धावसंख्या करणाऱ्या फलंदाजामुळे विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन पुढे आहेत, मात्र कमी वयात दीडशेहून अधिक धावा करण्यात यशस्वी जयस्वाल ब्रॅडमननंतर दुसरा आहे.