नवी दिल्ली: Abhishek Sharma Fight Haris Rauf : दुबईमध्ये झालेल्या आशिया कप 2025 च्या सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ यांच्यात वादाने चांगलाच गाजला.
172 धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर आक्रमक होते. चौथ्या षटकापर्यंत पाकिस्तानवरील दबाव वाढला होता. त्यानंतर पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने हरिस रौफला उत्तुंग षटकार खेचला.
या शॉटनंतर, रौफ (Abhishek Sharma Haris Rauf Fight) खूपच भडकला व त्याने अभिषेककडे रागाने पाहिले. मागे हटणाऱ्या अभिषेकनेही (Abhishek Sharma controversy) रौफला प्रत्युत्तर दिले. दरम्यान, भारतीय सलामीवीर शुभमन गिल देखील पुढे आला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला. तथापि, पंच आणि इतर खेळाडूंनी हस्तक्षेप करत वाद टाळण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे.
Abhishek Sharma Fight: अभिषेक हरिसशी भिडला-
172 धावांचा पाठलाग करताना, भारताने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसह डावाची चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात फलंदाजाने षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ होती.
त्यानंतर शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) त्याच्याकडे पाहिले आणि कॅमेऱ्यात अभिषेक काहीतरी पुटपटताना कैद केला. असे मानले जाते की तो म्हणाला, "चल जा, चेंडू टाक..." तो असं काहीतरी म्हणाला. मग त्याने स्फोटक पद्धतीने धावा काढल्या.
Shaheen vs Gill 🔥
— Suraj (@SunitaK97720452) September 21, 2025
Kohli vibes from Gill ...!!!
Ufff 🔥🔥#INDvPAK pic.twitter.com/IqOQOefivx
तिसऱ्या षटकात शुभमन गिल (Shubman Gill Shaheen Afridi) ने शाहीनच्या चेंडूवर दोन शानदार चौकार मारले. त्यानंतर गिल देखील काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी हरिस रौफ आला आणि त्याच्या मागील षटकात त्याने 12 धावा दिल्यानंतर त्याच्यावरचा दबाव स्पष्टपणे दिसून आला.
या षटकात गिलने रौफच्या गोलंदाजीवर चौकार मारला आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असलेला अभिषेक संतापला. त्याने रौफला तोंड दिले आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर पंचांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली.
Asia Cup Super Four Points Table: पाकिस्तानला हरवून भारत अव्वल स्थानावर
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने 7 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने सामना जिंकला. या विजयासह, टीम इंडिया सुपर-4 पॉइंट्स टेबलमध्ये (Asia Cup 2025 Standings Super-4) अव्वल स्थानावर पोहोचली आहे. पाकिस्तानला हरवून भारताने 2 गुण मिळवले आहेत आणि संघाचा नेट रन रेट 0.689 आहे.