जेएनएन, नवी दिल्ली. IND vs ENG ODI Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 आणि एकदिवशीय सामन्यांची मालिका सुरु आहे. इंग्लंडने भारताला टी20 मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. आता 14 जुलैपासून भारतीय संघ हा एकदिवशीय सामने खेळणार आहे.
भारताला जिंकता आला नाही एकही सामना
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध झालेल्या T20 मालिकेत भारताला मोठी हानी झाली आहे. भारताला या पाच सामन्यांच्या मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. एक सामना पावसाने वाहून गेल्यानंतर उर्वरित चारही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. यामुळे भारत आयसीसी टी20 रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे. तर इंग्लंडने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
भारत करणार बदला घेण्याचा पर्यंत!
ट्वी20 च्या मालिकेनंतर आता भारत 14 जुलैपासून एकदिवशीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर असेल. या दौऱ्यातील मालिकेत 3 सामने होणार आहेत. या मालिकेचे नेतृत्व हे भारताने शुभमन गिलवर सोपवले आहे. तर उपकर्णधार पद हे श्रेयस अय्यर कडे आहे. त्यामुळे भारत या एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड रोकण्याचा पर्यंत करेल. आणि टी 20 मधील आपल्या लज्जास्पद पराभवाचा बदला घेण्याचा जरूर पर्यंत करेल.
भारतीय संघात रोहित-कोहली
एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेचे नेतृत्व हे भारताने शुभमन गिलवर सोपवले आहे. तर उपकर्णधार पद हे श्रेयस अय्यर कडे आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीही मैदानात खेळताना दिसतील.
एकदिवशीय सामन्यांचे वेळापत्रक
- 1st ODI - 14 जुलै ( Birmingham, Edgbaston)
- 2nd ODI - 16 जुलै ( Cardiff, Sophia Gardens)
- 3rd ODI - 19 जुलै ( London, Lord's)
भारताचा एकदिवसीय संघ -
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार
