क्रीडा विभाग, नवी दिल्ली. Asian Games 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय संघाचा सामना चमारी अथापथ्थूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाशी झाला. भारताने श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव केला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताची सर्वोच्च धावसंख्या
स्मृती मानधना (79) आणि रिचा घोष (49*) यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर, भारताने मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 216 धावा केल्या. रिचा घोषने 22 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 49 धावा केल्या, तर भारती फुलमाली 7 धावांवर नाबाद राहिली.
स्मृती मानधनाची शानदार अर्धशतकी खेळी
17 व्या षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला; स्मृती मानधना 79 धावा करून बाद झाली. कुमारीच्या गोलंदाजीवर, षटकातील पाचव्या चेंडूवर 'डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग'च्या दिशेने दिलहारीने मानधनाचा झेल घेतला. स्मृतीने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने 45 चेंडूंत 79 धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.
श्रीलंकाने केला 69 धावा
भारताने दिलेल्या 217 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेने 69 धावा केल्या. समरी अडप्पथी हिने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर भारताकडून दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर शफाली, श्री चरणी आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
