नवी दिल्ली. Asia Cup AFG vs HK: अबू धाबी येथे 9 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगवर 94 धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, सेदिकुल्लाह अटल (नाबाद 73) आणि अझमतुल्लाह उमरझाई (21 चेंडूत 53) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 बाद 188 धावांची मजबूत धावसंख्या उभारली.

मजबूत लक्ष्याचा पाठलाग करताना, हाँगकाँगचा संघ 20 षटकांत 9 बाद 94 धावांवर आटोपला. अफगाण गोलंदाजीच्या आक्रमणासमोर हाँगकाँगची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. या सामन्यातील पराभवासह, हाँगकाँगच्या संघाचा टी20 मध्ये सर्वाधिक धावबाद होण्याचा लज्जास्पद विक्रम अबाधित राहिला.

Asia Cup: Hong Kong ला दुहेरी धक्का

खरंतर, 189 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या डावाची सुरुवात खूपच वाईट झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने चार विकेट गमावल्या आणि त्यांना फक्त 23 धावा करता आल्या. रनआउटची समस्या हाँगकाँग संघाचा पिच्छा सोडताना दिसत नाही.

या सामन्यातही निजाकत खान आणि कल्हण चालू धावबाद झाले. सामन्यातील पराभवानंतर हाँगकाँगची लज्जास्पद आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीपासून हाँगकाँगला एकूण 34 धावबादांचा सामना करावा लागला आहे. 103 टी-20 सामने खेळणाऱ्या संघांमध्ये सर्वाधिक धावबाद होण्याचा हा लज्जास्पद विक्रम त्यांच्या नावावर आहे. यापैकी 29 धावबाद अव्वल 7 फलंदाजांमध्ये झाले आहेत.

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या पहिल्या सामन्यात, सलामीवीर अंशुमन रथ दुसऱ्याच चेंडूवर बाद झाल्याने संघाला मोठे नुकसान सहन करावे लागले. फजलहक फारुकी याच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्नात अंशुमन यष्टिरक्षक रहमानउल्लाह गुरबाजच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. या वेळी तो आपले खातेही उघडू शकला नाही.

    हाँगकाँगकडून बाबर हयातने 43चेंडूत सर्वाधिक 39 धावा केल्या. तर उर्वरित फलंदाजांता अफगाण आक्रमणासमोर टिकाव लावला नाही. 

    अफगाणिस्तानसाठी अटल-उमरझाई चमकले

    तत्पूर्वी, अफगाणिस्तानचे सलामीवीर अटल आणि उमरझाई यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. अटलने ५२ चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 73 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद नबीने 26 चेंडूत 33 धावा केल्या, तर अझमतुल्लाह उमरझाईने 53 धावा केल्या आणि या खेळींच्या मदतीने अफगाणिस्तान संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा करू शकला.