इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. विरोधी आघाडीकडून  बी-सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पार पडललेल्या बैठकीत रेड्डी यांच्या नावावर सहमती झाली. या बैठकीत इंडिया आघाडीतील अनेक नेते सहभागी झाले होते. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते.

ही उपराष्ट्रपतीपदाची लढाई एक वैचारिक लढाई आहे आणि सर्व विरोधी पक्षांनी यावर एकमत केले आहे आणि म्हणूनच आम्ही बी सुदर्शन रेड्डी यांना संयुक्त उमेदवार म्हणून नामांकित केले आहे" असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी जाहीर करताना म्हटलं आहे.

बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946  रोजी सध्याच्या तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तत्कालीन इब्राहिमपट्टणम तालुक्यातील अकुला मैलाराम गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. 2007 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि 2011 मध्ये निवृत्त झाले.