पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणीतरी एका नवजात बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून रस्त्यावर फेकून दिले. काही तासांपूर्वी जन्मलेले हे बाळ रात्रभर रस्त्यावर रडत होते आणि भटक्या कुत्र्यांनी त्याचे रक्षण केले.
लोक अनेकदा भटके कुत्रे विनाकारण पादचाऱ्यांना चावतात अशी तक्रार करतात. तथापि, नादियामध्ये, अगदी उलट घडले. भटक्या कुत्र्यांनी रात्रभर एका नवजात बाळाला घेरले आणि कोणालाही त्याच्या जवळ जाऊ दिले नाही.
रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळले नवजात बाळ-
स्थानिक रहिवाशांना ही घटना आश्चर्यचकीत करणारी आहे. हिवाळ्याच्या एका रात्री, संपूर्ण रस्ता ओसाड असताना, रेल्वे कॉलनीतील बाथरूमसमोर एक नवजात बाळ सोडून दिलेले आढळले. बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेले होते. बाळाविषयी माहिती घेण्यासाठी आजुबाजुला काहीच पुरावा नव्हता.
लोकांनी मुलाच्या रडण्याकडे दुर्लक्ष केले-
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, बाळाच्या रडण्याचा आवाज रात्रभर ऐकू येत होता, परंतु सर्वांना वाटले की कदाचित कोणाच्या तरी घरी आजारी मूल आहे व ते रडत असेल. कोणालाही कल्पना नव्हती की बाळ थंडीत रस्त्यावर पडले आहे. बाळाचे रडणे ऐकून कुत्र्यांनी त्याला सर्व बाजूंनी घेरले आणि रात्रभर तिथेच बसून राहिले.
सकाळी जेव्हा लोकांना कुत्रे दिसले तेव्हा ते एका वर्तुळात बसलेले होते, मध्यभागी ब्लँकेटचा गठ्ठा होता. लोकांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुत्र्यांनी त्यांना मार्ग करून दिला. ब्लँकेट उघडल्यावर त्यांना आत एक नवजात बाळ आढळले.
नवजात शिशू रुग्णालयात दाखल -
बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. त्याला महेशगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्याला कृष्णनगर सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की मुलाला कोणतीही दुखापत नाही. त्याच्या डोक्यावर थोडेसे रक्त होते, कदाचित जन्मापासूनच असेल. जन्मानंतर काही मिनिटांतच बाळाला रस्त्यावर फेकण्यात आले.
कॉलनीतील कोणीतरी मुलाला जाणूनबुजून निर्जन रस्त्यावर सोडून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि मुलाच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
