नवी दिल्ली: भारतीय पुरुषाशी लग्न केल्यानंतर तिच्यात झालेल्या बदलांचे वर्णन करणाऱ्या एका युक्रेनियन महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिक्टोरिया चक्रवर्ती नावाची ही महिला गेल्या आठ वर्षांपासून भारतात रहात आहे.

व्हिक्टोरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लग्नानंतर झालेल्या काही मोठ्या बदलांचे संकेत देताना दिसत आहे.

व्हिक्टोरियाने लग्नानंतर झालेले तीन बदल सांगितले -

व्हिक्टोरिया म्हणते की भारतीय पुरुषाशी लग्न केल्याने तिचे आयुष्य बदलले आहे, तिच्या ड्रेसिंग स्टाईलपासून ते भारतीय जेवण आणि स्थानिक सणांपर्यंत. यामुळे तिच्या आयुष्यात खूप आनंद आला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमधील 3 बदलांचा संदर्भ देत व्हिक्टोरिया म्हणाली-

  1. साडी माझ्या वॉर्डरोबचा एक अविभाज्य भाग बनली आहे. लग्नाला किंवा समारंभाला विना साडी जाण्याची कल्पनाही मी करू शकत नाही.
  2. पारंपारिक भारतीय जेवण खूपच चविष्ट असते, विशेषतः जेव्हा ते हाताने खाल्ले जाते.
  3. सण हे वर्षातील माझे आवडते काळ आहेत. रंग, दिवे आणि उत्सवात सहभागी झाल्यानंतर मला घरी असल्याचा अनुभव येतो. 

व्हिक्टोरियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याला आतापर्यंत जवळपास 3,00,000 व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिक्टोरियाच्या व्हिडिओवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत.

    नेटीझन्सनी दिल्या प्रतिक्रिया -

    व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, "तू भारतीय पोशाखात सर्वात सुंदर दिसतेस." दुसऱ्या युजरने लिहिले, "तू पूर्णपणे मिसळून गेली आहेस आणि इथे जीवनाचा आनंद घेत आहेस. तुला पाहून खूप आनंद झाला."

    यापूर्वी, व्हिक्टोरियाने एका व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की अनेक लोकांनी तिला भारतात जाण्यापासून परावृत्त केले होते. मी फक्त इथे आले नाही, तर मी प्रेमात पडले, लग्न केले आणि येथेच व्यवसाय सुरू केला, व्हिक्टोरिया म्हणाली. आता मी या सुंदर प्रवासाबद्दल ब्लॉग लिहित आहे.