पाटणा -खाजेकलां थाना क्षेत्रातील दुल्ली घाट भागात शनिवारी उशिरा रात्री एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ऑटो चालक मुलाने चिंटूने आपली विधवा आई रेखा देवी उर्फ मंजूला मारहाण केली व तिला रागाच्या भरात तिला जिंवत जाळले.

घटनेची सूचना मिळाल्यानंतर जेव्हा खाजेकलां थाना पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घरात आईचा जळालेला मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. 

मुलाला आहे नशेचे व्यसन-

या प्रकरणात एएसपी राजकिशोर सिंह यांनी सांगितले की प्राथमिक तपासात समजले आहे की मृत महिलेचा आरोपी मुलगा दारूच्या आहारी गेलेला आहे आणि मानसिकरित्या विक्षिप्तपण आहे. हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्रकरणात महिलेचा दीर अमर साहनीच्या जबाबावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खाजेकलां पोलीस ठाणे इनचार्ज विद्यानंद वर्मा यांनी सांगितले की शनिवारी रात्री जवळपास 1:30 वाजता दीवान मोहल्ला, दुल्ली घाटमध्ये भाड्याने राहणारी 60 वर्षीय रेखा देवी उर्फ मंजूला त्यांच्या मानसिकरित्या विक्षिप्त ऑटो चालक मुलाने तिला जिवंत जाळल्याची सूचना मिळाली.

आतमधून बंद होते दार -

    पोलीस जेव्हा पोहोचले तर दार आतमधून बंद होते. धक्का देऊन दार उघडल्यावर आत खोलीत जळालेला मृतदेह आढळला. आईला जाळणारा आरोपी मुलगा घरातच बसला होता. 

    पोलिसांना पाहून आरोपीने छपावरून उडी मारली. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एका शेजाऱ्याने जेव्हा जळत असलेल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्याच्या हाताचा चावा घेत त्याला जखमी केले. 

    एएसपी राजकिशोर सिंह यांनी रविवारी सांगितले की दुल्ली घाट मोहल्ल्यात नन्हकी साहनीची 60 वर्षीय पत्नी रेखा उर्फ मंजू देवी आपल्या पुत्र चिंटूसोबत बसंत लाल रायच्या घरात भाड्याने राहत होती. घटनेच्या वेळी आरोपी गांजाच्या नशेत होता.

    नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये होणार पोस्टमॉर्टम-

    घर मालक आणि शेजाऱ्यांच्या सूचनेनंतर पोहोचलेल्या खाजेकलां ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले आहे.