जेएनएन, नवी दिल्ली: Jantar Mantar Protest: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. आजही हे आंदोलन सुरु आहे. आज राहुल गांधी आणि काँग्रेस नेते यात सामील झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी-शरद पवार) चे प्रमुख शरद पवार जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी दाखल झाले.
अभिजीत दिपकेसोबत साधला संवाद
शरद पवार जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेणित. त्यांनी आंदोलक अभिजीत दिपके सोबत संवाद साधला आहे. त्यांनी आंदोलक आणि जखमी विद्यार्थांची विचारपूर केल्याची माहिती आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून, या प्रकरणातील जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी जंतरमंतर येथे एकत्र आले होते.
#WATCH | Delhi: Nationalist Congress Party (NCP-SCP) chief Sharad Pawar arrives at Jantar Mantar protest site. #CJPProtest pic.twitter.com/o2xRUg5NNz
— ANI (@ANI) July 21, 2026
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, केसी वेणुगोपाल, पवन खेडा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान आवासाजवळ आंदोलन करत आहेत.
त्यांनी युवा विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे, पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यांच्या सोबत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहनही आहेत. ते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत आहेत.
