जेएनएन, नवी दिल्ली. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिकनगावमध्ये पतीसोबत नाचत असलेली एक तरुणी अचानक कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे समोर आले आहे. 

ही घटना खरगोण जिल्ह्यातील भिकनगाव येथील पलासी गावात घडली. मृत महिलेचे नाव सोनम असे आहे. तिचे लग्न या वर्षी मे महिन्यात झाले होते. तिच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

दुर्गापूजेत नाचताना सोनम कोसळली ती परत उठलीच नाही -

रविवारी रात्री पलासी गावात दुर्गा पूजा साजरी होत होती. सोनम तिच्या 19 वर्षीय पती कृष्णपालसोबत नाचत होती. नाचत असताना सोनमला हृदयविकाराचा झटका आला आणि ती कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

चार महिन्यापूर्वीच झाले होते लग्न -

सोनम ही भिकनगावमधील टेमला गावची रहिवासी होती. तिचे वडील विजय यादव यांनी या वर्षी मे महिन्यात तिचे लग्न कृष्णपालशी ठरवले. सोनम आणि कृष्णपाल यांनी 1 मे रोजी लग्न केले. तथापि, लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच सोनमचे निधन झाल्याने कृष्णपालला मोठा धक्का बसला आहे.