जेएनएन, नवी दिल्ली. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांची जंतरमंतर येथे भेट घेतली. त्यांनी दिपके सोबत चर्चा केली आणि आंदोलनाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील होते.
VIDEO | Delhi: Maratha activist Manoj Jarange Patil meets CJP founder Abhijeet Dipke at Jantar Mantar.#JantarMantar #NEET
— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/EXKfw6nK2h
'विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न सरकारने केला, तर'
"आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय कोणीही मागे हटणार नाही. आपल्या देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. हे भाजपाचे सरकार प्रत्येकवेळी गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय करते. यापुढच्या काळात जर विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न सरकारने केला, तर याचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही ही जागा सोडू नका, संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे.” असं मनोज जरांगे म्हणाले.
नीट पेपर लीकचा विरोध आणि एज्युकेशन सिस्टममध्ये (शिक्षण व्यवस्थेत) सुधारणेच्या मागणीला घेऊन जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) धरणे आंदोलन आज बुधवारीही सुरूच आहे. विरोधी पक्षांचे नेते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सतत आंदोलनस्थळी पोहोचत आहेत.
सोनम वागचुक आणि सीजेपी नेते अभिजीत दिपके हे जंतर मंतर येथे आंदोलन करत होते. वागचुक यांच्या उपोषणाच्या 20 व्या दिवशी त्यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर 20 जुलै रोजी चलो संसद ची सीजेपीने हाक दिली. तिला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि अनेक भागात युवक आंदोलन स्थळी दाखल झाले.
हेही वाचा - दिल्लीतून मोठी बातमी! शरद पवार - सुप्रिया सुळेंनी घेतली पीएम मोदींची भेट; NDA ला पाठिंबा देणार?
20 जुलैच्या मार्चला वेगळं वळण
संसदे कडे मार्च कडताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे आंदोलनाला नवी दिशा मिळाली. आणि आंदोलन अधिक तिव्र झाले.
