जेएनएन, दिल्ली, Kalkaji Assembly Election 2025 Results: कालकाजी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण दिल्लीचा भाग असून, 70 विधानसभा मतदार संघमध्ये समाविष्ट आहे. कालकाजी या भागाला 1972 मध्ये विधानसभा मतदारसंघ बनवण्यात आला. 1993 मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे व्ही.पी.सिंग हे आमदार म्हणून निवडून आले. 2015 मध्ये या जागेवर आपचे अवतार सिंह विजयी झाले होते. त्यानंतर 2020 मध्ये आतिशी यांनी येथून विजय मिळवला होता.
मतमोजणीला सुरुवात
2025 च्या निवडणुकांसाठी कालकाजी मतदार संघातून आम आदमी पक्षाच्या अतिशी तसेच भाजपचे रमेश बिधुरी तर काँग्रेसच्या अलका लांबा हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. या तिन्ही उमेदवारांच्या भविष्याचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दिल्लीतील सर्व मतदार संघांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे.
आतिशी विजयी
कालकाजी विधानसभा मतमोजणी सुरु आहे. सर्व 12 राऊडची मतमोजणी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. त्यानुसार आतिशी यांना 52058 मते मिळाली आहेत. त्यांनी 3580 मतांनी विजय मिळवला आहे. तर भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांना 48478 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांना अवघे 4367 मते मिळाली आहेत.
पक्ष | आम आदमी पक्ष | भाजप | काँग्रेस |
उमेदवार | अतिशी | रमेश बिधुरी | अलका लांबा |
निकाल | 52058 (+ 3580) | 48478 ( -3580) | 4367 ( -47691) |