जेएनएन, मुंबई. देशभरात सध्या उत्सवाचे पर्व सुरु आहे. नवरात्रीसह अनेक सण-उत्सव येत आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. याच पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये. यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत रेल्वे प्रशासनाकडून देशभरातील विविध राज्यांसाठी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. 

येत्या काही दिवसांतील सण

येत्या काही दिवसांत दुर्गा पूजा, दसरा (2 ऑक्टोबर), करवा चौथ (9 ऑक्टोबर), धनतेरस (18 ऑक्टोबर), दिवाळी (21 ऑक्टोबर) आणि छठ पूजा (28 ऑक्टोबर) या महत्त्वाच्या सणांचा समावेश होतो.

देशभरातील विविध राज्यांसाठी विशेष गाड्या

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाड्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसामसह अनेक राज्यांसाठी चालवल्या जाणार आहेत. सणांच्या काळात घरी परतणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी रेल्वेने विशेष योजना आखली आहे. तसेच, अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन स्थानकांवर विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

विशेष गाड्यांचा तपशील रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार,

    • जबलपूर – दानापूर विशेष गाडी : 26 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर दर बुधवार आणि शुक्रवारी धावणार
    • मुंबई सेंट्रल – काठगोदाम :  1 ऑक्टोबरपासून सुरू
    • उधना – सुभेदारगंज : 3 ऑक्टोबरपासून सुरू
    • वांद्रे टर्मिनस – बडनी : 6 ऑक्टोबरपासून सुरू
    • आनंद विहार – भागलपूर : 20 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर दररोज धावणार
    • कोलकाता – लखनऊ : 2 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर चालणार
    • मऊ – उधना : 27 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर दर शनिवारी धावणार

    दिवाळी आणि छठच्या काळात गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रेल्वेने काही अतिरिक्त गाड्या राखीव ठेवल्या आहेत. तर काही विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी आणि सणासुदीच्या दिवसात जास्त गर्दी असलेल्या मार्गांवर या गाड्या चालवल्या जाणार आहेत.