नवी दिल्ली - Bihar Assembly Election 2025 Dates : बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून 6 नोव्हेंबर 2025 व 11 नोव्हेंबर 2025 रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी बिहारची सत्ता कोणाला मिळणार हे समजणार आहे. 243 सदस्यीय बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. 

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे -

  • बिहारमधील 243 जागांसाठी रणसंग्राम
  • बिहारमध्ये 7.43 कोटी मतदार
  • पुरुष मतदार- 3.92 कोटी
  • महिला मतदाता- 3.50 कोटी
  • ट्रान्सजेंडर- 1725
  • 14 लाख नवीन मतदार
  • प्रत्येक बुथवर 818 मतदार
  • एका मतदान केंद्रावर 1200 मतदारांचे लक्ष्य
  • फेक न्यूजवर करडी नजर
  • प्रत्येक बुथवर वेबकास्टिंगची व्यवस्था 
  • मतदार यादीतील चुका दुरुस्त केल्या.
  • पोलिंग स्टेशन ग्राऊंड फ्लोअरवर असतील
  • 22 वर्षानंतर मतदार याद्यात सुधारणा केली.

Bihar Election 2025 Schedule: पाहा बिहार विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक 

निवडणूक आयोगाने बिहारमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

बिहारमधील शेवटच्या विधानसभा निवडणुका 2020 मध्ये कोविड-19 महामारी दरम्यान झाल्या होत्या. या निवडणुका तीन टप्प्यात पार पडल्या. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर 2020 रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर 2020 रोजी झाले. निवडणुकीचे निकाल 10 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर झाले.

    2020 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

    २०२० च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर एनडीएने बिहारमध्ये सरकार स्थापन केले. एनडीएने एकूण 125 जागा जिंकल्या, तर महाआघाडीने 110 जागा जिंकल्या होत्या. 75 जागांसह आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

    एनडीए युतीच्या जागा

    भाजप – 74

    जेडीयू – 43

    विकासशील इंसान पार्टी (VIP) – 4

    हिंदुस्तानी अवाम मोर्चा (एचएएम) – 4

    महाआघाडीने 110 जागा जिंकल्या होत्या.

    पक्षाच्या जागा

    राजद - 75

    काँग्रेस -19

    सीपीआय (एमएल)-12

    -एआयएमआयएम आणि इतर - 5

    एनडीए विरुद्ध महाआघाडीला किती जागा मिळाल्या?

    2020० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, एनडीए आणि महाआघाडीमध्ये फक्त 12,000 मतांचा फरक होता. दोघांनाही 37% मते मिळाली. एनडीएला 37.26% मिळाले, तर महाआघाडीला 37.23% मिळाले. एनडीए आणि महाआघाडीला मिळालेल्या एकूण मतांमधील फरक फक्त १२,००० मतांचा होता. याचा अर्थ महाआघाडीने फक्त 12,000 मतांच्या फरकाने 15 जागा गमावल्या.

    बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडीमध्ये निकराची लढत आहे, परंतु प्रशांत किशोर यांचा जनसुरज पक्ष देखील एक नवीन आयाम जोडत आहे, जो बिहारच्या राजकारणात एक पर्यायी शक्ती म्हणून स्वतःला स्थापित करत आहे.

    निवडणूक कार्यक्रमपहिला टप्पा (121 विधानसभा मतदारसंघ)दुसरा टप्पा (122 विधानसभा मतदारसंघ)
    निवडणूक अधिसूचना जारी करण्याची तारीख10.10.2025 (शुक्रवार)13.10.2025 (सोमवार)
    उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख17.10.2025 (शुक्रवार)20.10.2025 (सोमवार)
    उमेदवार अर्ज छाननीची तारीख18.10.2025 (शनिवार)21.10.2025 (मंगलवार)
    उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख20.10.2025 (सोमवार)23.10.2025 (गुरुवार)
    मतदानाची तारीख06.11.2025 (गुरुवार)11.11.2025 (मंगळवार)
    मतमोजणीची तारीख14.11.2025 (शुक्रवार),
    निवडणूक पूर्ण होण्याची तारीख16.11.2025 (रविवार),