Bihar Assembly Elections : बिहारच्या राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज दुपारी चार वाजता राज्य विधानसभा निवडणूक 2025 च्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिल्लीत प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करतील. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले जाईल की, बिहार विधानसभा निवडणूक किती टप्प्यात घेतली जाईल तसेच मतदान व मतमोजणी कोणत्या तारखेला होईल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहार विधानसभा निवडणूक एक किंवा दोन टप्प्यात घेतली जाऊ शकते. निवडणूक प्रक्रियेत यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाईल. त्याचबरोबर निवडणूक आयोग विशेषकरून मतदान केंद्रांवरील सुरक्षा, संवेदनशील भागात केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त आणि मतदार सेवा केंद्रांच्या व्यवस्थेवरही  चर्चा करेल.

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्ष आपली मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. NDA कडून मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सभांचा धडाका लावला असून जनतेच्या सतत संपर्कात आहेत. दुसरीकडे विरोधी आघाडीचे नेते तेजस्वी यादवही रोजगार, भ्रष्टाचार आणि महागाई सारख्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. राहुल गांधी यांनीही वोट अधिकार यात्रा काढून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.