नवी दिल्ली. दुबईतील नोकरी सोडून बेंगळुरूला परतलेल्या एका व्यक्तीने रविवारी आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली. धर्मशीलम (30) हा दुबईमध्ये गवंडी काम करत होता, तर त्याची पत्नी मंजू (27) ही बेंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरी करत होती.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या जोडप्याने सप्टेंबर 2022 मध्ये लग्न केले होते आणि त्यांना मुले नव्हती. दोघे महिलेचे वडील पेरियास्वामी यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होते.
रविवारी रात्री 9:30 च्या सुमारास पेरियास्वामी यांना दोघांचे मृतदेह आढळले. मंजूचा मृतदेह बेडवर पडला होता. तिच्यावर चाकूने वार करण्यात आले होते तर धर्मशीलम नायलॉनच्या दोरीने छताच्या पंख्याला गळफास घेतला होता. घटनेचे कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.