बरेली- येथील स्पोर्ट्स स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या होमगार्ड भरती परीक्षेत सोमवारी सहा महिला उमेदवार जखमी झाल्या. त्यापैकी पाच जणांच्या पायांना दुखापत झाली आहे. तर एक तरुणी धावताना चक्कर येऊन मैदानातच कोसळली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फर्रुखाबादमधील मऊ येथे राहणाऱ्या 28 वर्षीय अनामिका हिने सांगितले की, धावताना अचानक तिला चक्कर आली व तिची प्रकृती बिघडली. त्याचबरोबर पीलीभीत येथील बीसलपूर निवासी संध्या हिने सांगितले की, धावण्याच्या अंतिम राउंडमध्ये जवळपास 50 मीटर अंतर बाकी असताना तिच्या पायाला दुखापत झाली व ती कोसळली.
तपासणीत तिच्या पायांना फ्रॅक्चर झाल्याचे समजले. त्याचप्रमाणे शाहजहांपूरमधील कलान गावाची रहिवासी रिंकी पाचवा राउंड धावताना डोळ्यासमोर अंधार पसरला व बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली.
लखीमपूर खीरी निवासी 28 वर्षीय काजल जायसवाल आणि नीतू देवी सहाव्या राउंडमध्ये पायात फ्रॅक्चर झाल्याने त्या खाली कोसळल्या. 25 वर्षीय सरिताही जखमी झाली.
