रॉयटर्स, नवी दिल्ली: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जगात चिनी AI चॅटबॉट DeepSeek च्या नावाची मोठी चर्चा सुरू आहे. भारतातही या चॅटबॉटची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

फक्त 6 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 50 कोटी रुपये) च्या खर्चात आणि दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार झालेल्या AI मॉडेलने अमेरिकेच्या टेक मार्केटमध्ये खळबळ उडवली आहे. अनेक तज्ज्ञांचा दावा आहे की OpenAI च्या ChatGPT च्या तुलनेत DeepSeek अधिक चांगली कामगिरी करत आहे.

अश्विनी वैष्णव यांनी का केलेDeepSeekचे कौतुक?

भारताचे IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी DeepSeekची प्रशंसा करताना म्हटले की, हा मॉडेल भारताच्या 'IndiaAI मिशन' साठी प्रेरणादायी आहे.

मंगळवारी (28 जानेवारी) ओडिशातील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले:
"काही लोक विचारतात की सरकारने AI मिशनसाठी इतकी रक्कम का दिली? तुम्ही DeepSeek पाहिले आहे का? फक्त 5.5 दशलक्ष डॉलर्समध्ये एक अत्यंत शक्तिशाली मॉडेल तयार झाले. खरी ताकद ही बुद्धीच्या वापरामध्ये आहे."

ओपनएआयच्या CEO ला दिले उत्तर

    विशेष म्हणजे चीनच्या नावाखाली IT मंत्री वैष्णव यांनी OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

    OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी काही दिवसांपूर्वी भारतात 10 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर AI मॉडेल तयार करणे अशक्य असल्याचे म्हटले होते.

    सॅम ऑल्टमन यांनी गेल्या वर्षी भारत दौऱ्यात सांगितले होते की,
    "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्यासारखे फाउंडेशनल मॉडेल तयार करणे तुमच्यासाठी अशक्य आहे, प्रयत्न करू नका. पण तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तरीही प्रयत्न केला पाहिजे. मी दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवतो."

    आज (30 जानेवारी) अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की 10 महिन्यांत भारताचे स्वदेशी जेनरेटिव्ह AI मॉडेल लाँच होईल.

    त्यांच्या मते, हा AI मॉडेल ChatGPT, Gemini आणि DeepSeek सारख्या आघाडीच्या AI मॉडेल्सना टक्कर देईल. सरकारने 10 कंपन्यांना यासाठी शॉर्टलिस्ट केल्या आहे.

    केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, स्वदेशी AI मिशन पूर्ण करण्यासाठी सध्या सरकारी संगणकीय सुविधांमध्ये 18,693 ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स (GPU) उपलब्ध आहेत.