एजन्सी, ठाणे: ठाणे जिल्ह्यात भरधाव कंटेनर ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने दोन 18 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
हा अपघात मुंब्रा येथील रेतीबंदर रोडवर रविवारी रात्री सुमारे 11.40 वाजता घडला, असे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले.
या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की पीडित मुले या अवजड वाहनाखाली अडकली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच, अज्ञात ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला, असेही ते पुढे म्हणाले.
तडवी यांनी सांगितले की, मुंब्रा पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही किशोरवयीन मुलांना बाहेर काढले आणि त्यांना तातडीने महापालिका रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
आरीस अस्लम कुरेशी आणि इरफान अहमद अन्सारी अशी मृतांची ओळख पटली असून हे दोघेही मुंब्रा येथील रहिवासी आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.
