जेएनएन, मुंबई. Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला सोपवले होते. आयोगाच्या या निकालाला आव्हान देत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी (Shivsena case in Supreme court) पार पडली. या प्रकरणावर ऑगस्टमध्ये सुनावणी घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत दिले, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election) उद्धव ठाकरेंना सुप्रीम दिलासा मिळतो का? याकडे सर्वांची नजर लागली आहे.
पार पडली. या प्रकरणावर ऑगस्टमध्ये सुनावणी घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत दिले, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना सुप्रीम दिलासा मिळतो का? याकडे सर्वांची नजर लागली आहे.
एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गटाकडून याचिका दाखल करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी यावर अंतरिम दिलासा मिळावा, अशी मागणी केली होती. यावर आज (सोमवार) झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना केल्या.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की, या प्रकरणाला आता दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा, असा सल्ला ठाकरे गटाला दिला. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असेही न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. या सुनावणीवेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली.
ऑगस्टमध्ये होणार प्रकरणाची सुनावणी -
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर ऑगस्टमध्ये सुनावणी घेणार असल्याचे सांगितल्यावर कपिल सिब्बल यांनी तारीख निश्चित करण्याची मागणी केली. त्यावेळी पुढील २-३ दिवसांत तारखांचा आढावा घेऊन ऑगस्टमधील सुनावणीची तारीख देऊ, असं कोर्टाने सांगितले.
मनपा निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मिळणार दिलासा?
शिवसेना प्रकरणावर जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यास जैसे थे परिस्थिती असेल. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो. मात्र जर यासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहायला लागली अन् त्याआधी निवडणुका घोषित झाल्यास शिंदे गट धनुष्यबाण व शिवसेना नाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वापरू शकते. ऑगस्टमध्ये होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून शिवसेना व धनुष्यबाण ठाकरेंकडे जातो की शिंदेंकडेच राहतो, याची उत्सुकता लागली आहे.