पुणे - पुण्यात नवजवान मित्र मंडळाचा ‘कालभैरव-जोगेश्वरी विवाह सोहळा’ देखावा राज्यभरात तुफान चर्चेत आला आहे. तो त्यातील एका नृत्यांगनेच्या अप्रतिम परफॉर्मन्सने. सदाशिव पेठेतील नवजवान मित्र मंडळाने यंदाही आपल्या आकर्षक जिवंत देखाव्याने भाविक आणि नागरिकांची प्रचंड गर्दी खेचली. 

मंडळाने यंदा श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा साकारला होता. हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी गर्दी केली होती. या देखाव्यातून एक तरुणी चांगलीच चर्चेत आली आहे.

मंडळाने दोन वर्षांपूर्वी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा सादर केला होता. त्या देखाव्यालाही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि तो विशेष लोकप्रिय ठरला होता. त्यावेळीही ही तरुणी चर्चेचे कारण ठरली होती.

कोण आहे ही तरुणी?

 ‘कालभैरव-जोगेश्वरी विवाह सोहळा’ देखाव्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली तरुणी म्हणजे अवंतिका शिंदे भांडाळकर (Avantika Shinde Bhandalkar) आहे. ती पुण्यातील एक लोकप्रिय परफॉर्मेंस आर्टिस्ट, कोरियोग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचे तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून समजते. त्यातबरोबर पुण्यातील प्रसिद्ध गणेशोत्सव काळात ती आपल्या खास डान्स स्टेप्स आणि अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकते. तिला पाहण्यासाठी तरुण-तरुणी गर्दीत उभे राहून देखावा पाहण्यासाठी येतात. यंदाही आल्या अनोख्य स्टाईलने व चेहऱ्यावरील हावभावाने अवंतिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

अवंतिका पेशाने डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. पुण्यातील नवजवान मित्र मंडळाच्या देखाव्यात पारंपरिक आणि शालीनतेने केलेले नृत्य लोकांना खूप पसंद पडले आहे. मर्यादेत राहून व डोक्यावरील पदरही खाली पडू न देता नृत्य करून लोकांची मने जिंकता येतात, अशा कमेंट नेटीझन्स करत आहेत. अनेक जण तिच्या लोकप्रियतेची तुलना प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलशी करत आहेत. कोणतेही अश्लील व आक्षेपार्ह स्टेप्स न करता केवळ आपल्या नृत्य कलेने व शालीन एक्सप्रेशन्सने अवंतिकाने लाखो प्रक्षेकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.  सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स असून आपले डान्स रील्स आणि कोलेबोरेशन्स पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.