पुणे. Vande bharat express: मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या एका डब्याचा पुणे जंक्शन रेल्वे स्टेशन जवळ रुळावरून घसरण्याचा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघात कसा घडला?
माहितीनुसार, ट्रेन मुख्य लाईनवरून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे वळत असताना हा प्रकार घडला.
* इंजिन पुढे योग्य ट्रॅकवर गेले
* मात्र 15 क्रमांकाचा डबा ट्रॅक बदलण्यात अपयशी ठरला
* यामुळे डबा रुळावरून घसरला. या घटनेमागे पॉइंट/ट्रॅक बदल यंत्रणेत तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम!
* प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील हालचालींवर परिणाम
* इतर प्लॅटफॉर्मवरील सेवा सुरळीत सुरू
* मार्गावरील काही गाड्यांमध्ये किरकोळ उशीर होत असल्याची माहिती.
सोलापूर प्रवाशांसाठी मोठी अपडेट!
सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना केले आहे. यामध्ये
* पर्यायी (स्पेशल) ट्रेनची व्यवस्था
* प्रवाशांना इतर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येणार
* लवकरच नवीन गाडी सोलापूरच्या दिशेने रवाना होणार
प्रशासनाचा इशारा!
प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता रेल्वेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच प्लॅटफॉर्मवरील घोषणांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
