जेएनएन, पिंपरी-चिंचवड: हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) परिसरातील नामांकित शाळेला सकाळी धमकीचा ईमेल मिळाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ईमेलमध्ये शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या थरकाप उडवणाऱ्या संदेशानंतर शाळे प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळवले. घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली असून, आयटी पार्क परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांची जलद कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिसांचे (Pimpri-Chinchwad Police) पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (BDDS) तसेच श्वान पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.हिंजवडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांनी सांगितले की,सकाळी शाळेला हा मेल प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. आमचे पथक, BDDS आणि श्वान पथक परिसराची कसून तपासणी करत आहेत. हा मेसेज अफवा असण्याची शक्यता आहे, पण तपास पूर्ण झाल्यावरच सत्य समोर येईल.
ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू
पोलिसांनी ईमेलचा आयपी पत्ता आणि तांत्रिक तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे.सायबर सेलची मदत घेऊन ईमेल पाठवणाऱ्याचा माग काढला जात आहे. धमकी वास्तविक आहे की खोटी, याची पडताळणी सुरू केली आहे.
परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शाळेचा परिसर पूर्णपणे घेराबंद करण्यात आला आहे. आयटी कंपन्यांनाही सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहे.पालकांनी घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले आहे.
पालकांत भीती, सतर्क प्रशासन
धमकीचा ईमेल ओळख पटलेला नसल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. अनेक पालकांनी शाळेबाहेर चौकशीसाठी गर्दी केली होती. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सतत माहिती दिली जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सायबर सेल, गुन्हे शाखा आणि BDDS पथक मिळून तपास करत आहेत. प्राथमिक पाहणीत शाळेच्या परिसरात संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, मात्र पोलिसांनी संपूर्ण कॅम्पस दोनदा तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: Mundhwa Land Scam Case: दिग्विजय पाटीलची कसून चौकशी, पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार
हेही वाचा: Orange Gate Tunnel: हजारो लोकांचे हजारो तास वाचणार.. मेट्रो-3 च्या 50 मीटर खोल अन् मुंबईतील 700 इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
