जेएनएन, पुणे: मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात तपास वेग घेत असून नवे तपशील समोर येत आहेत. या प्रकरणात कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दिग्विजय पाटीलची EOW कडून कसून चौकशी
पाच दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजावल्यानंतर दिग्विजय पाटील 2 डिसेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर होते. EOW अधिकारी कसून चौकशी करण्यात आली आहे.दरम्यान चौकशीत महत्त्वाचे मुद्दे समोर आल्याची माहिती आहे.
दिग्विजय पाटील यांनी पुढील चौकशीसाठी हजर राहण्याची तयारी दर्शवली असून,“मी जय पवारांच्या लग्नासाठी परदेशात जात आहे; परत आल्यानंतर पुन्हा चौकशीसाठी येईन,” असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
चौकशीमध्ये नवे धागेदोरे – पार्थ पवारांसाठी संकट
दिग्विजय पाटील यांच्या जबाबांदरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे उघड झाले असून, त्याचा पार्थ पवारांना थेट फटका बसू शकतो, अशी शक्यता तपास यंत्रणांमध्ये व्यक्त केली जात आहे. पार्थ पवार हे अमेडिया कंपनीचे 99% भागीदार असून जमीन खरेदी व्यवहार त्यांच्या कंपनीसाठी झाल्याचे समोर आले आहे. पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
दरम्यान, जय पवारांचे बहरीन येथे लग्न आयोजित केले असले तरी, पार्थ पवारांना वाढत्या तपासामुळे पुढील कोणतीही कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शीतल तेजवानीला अटक,मुख्य आरोपीचा पर्दाफाश
या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार शीतल तेजवानीला 3 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.तिची यापूर्वी दोन वेळा चौकशी झाली आहे. चौकशीत जमिनीच्या खरेदी-विक्रीतील थेट सहभाग स्पष्ट झाल्यानंतर अखेर अटक करण्यात आली आहे.आज शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा: Pune Land Scam: पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची आज कोर्टात पेशी, दिग्विजय पाटीलची 5 डिसेंबरला चौकशी
हेही वाचा: Mundhwa Case: मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात शितल तेजवानीला अटक
