जेएनएन, पुणे: शहरातील चर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी असलेल्या शीतल तेजवानीला (Shital Tejwani) काल न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान पुणे पोलिसांनी  सखोल चौकशीसाठी जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

पोलिसांनी सादर केला रिमांड रिपोर्ट
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात शीतल तेजवानीवर (Shital Tejwan गंभीर आरोप नोंदवले आहेत.जमीन खरेदी-विक्रीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असल्याचा अहवाल दिले आहे.
अनेक लोकांची फसवणूक
आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता
सहआरोपींसोबत संगनमत करून व्यवहार लपवण्याचा प्रयत्न
या सर्व मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून न्यायालयाने पुणे पोलिसांचा युक्तिवाद मान्य केला आणि शीतल तेजवानीला (Shital Tejwan 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा: Mundhwa Land Scam Case: दिग्विजय पाटीलची कसून चौकशी, पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार