जेएनएन, सांगली. Sangli Latest News: आष्टा नगरपरिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले असून स्ट्रॉंग रूमसमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मतदानाचा टक्का संशयास्पदरीत्या वाढवल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रणित शहर विकास आघाडीने केला आहे.
या आरोपानंतर शेकडो कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमच्या जागी जमा झाले आहे असून परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
आष्ट्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान अखेरच्या तासात मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचे चित्र दिसले. हा वाढीव टक्का कुठून आला, हे स्पष्ट न झाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. मतदान यादी आणि अंतिम टक्केवारीत विसंगती असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
सुरक्षा अभावाचा गंभीर आरोप
कार्यकर्त्यांनी केला आहे. स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी पुरेसा सुरक्षा बंदोबस्त नसणे. इतक्या मोठ्या निवडणुकीनंतर स्ट्रॉंग रूमला कडक निगराणी आवश्यक असताना सुरक्षा कमी असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनावर केला आहे.सुरक्षा अभावामुळे ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो, असा माविआनी केला आहे.
पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
आंदोलन दरम्यानपरिसरात तणाव असून पोलिसांनी वाढीव बंदोबस्त केले आहे. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. स्ट्रॉंग रूमजवळ जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवावी
दरम्यान, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, मतदान टक्केवारीतील विसंगतीची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवून प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवावी अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार माविआच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आष्ट्यातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून परिस्थितीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
