जेएनएन, पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांत लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली (Pneumonia Cases increases in Pune) आहे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जवळपास चारपट अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
प्रादुर्भावाची कारणे!
- बदलते हवामान आणि हवेतील वाढते प्रदूषण हे प्रमुख कारण समोर आले आहे.संसर्गजन्य रोगांचा फैलाव
- या कारणांमुळे लहान मुलांच्या श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याने न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे.
प्रमुख लक्षणे!
- पाच वर्षांखालील मुलांमध्ये खालील लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत :
- सतत खोकला आणि सर्दी
- ताप येणे
- श्वास घेताना अडथळा / धाप लागणे
- ऑक्सिजनची पातळी कमी होणे
डॉक्टरांचा सल्ला
डॉक्टरांच्या मते, ही लक्षणे दिसताच तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास आजार गंभीर रूप धारण करू शकतो.
मुलांचे लसीकरण वेळेत पूर्ण घेण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान हातांची स्वच्छता आणि स्वच्छ वातावरण राखणे.थंड हवामानात गरम कपड्यांचा वापर करणे,रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार देणे.गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना नेण्याचे प्रमाण कमी ठेवणे आदी प्रमुख सल्ला डॉक्टर कडून देण्यात आला आहे.
पालकांना आवाहन!
महापालिकेकडून पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, मुलांची काळजी घेण्यात दुर्लक्ष करू नये, तसेच श्वसनासंबंधी त्रास दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
