एजन्सी, पुणे. Pune Latest News: पुण्यातील एका "मानसिक दृष्ट्या अस्थिर" व्यक्तीने गुरुवारी पहाटे सरकारी रुग्णालयाच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मानसिक स्थिती अस्थिर
5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी विजय नावाच्या व्यक्तीला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली होती. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती अस्थिर असल्याने त्याला सरकारी ससून जनरल रुग्णालयात आणण्यात आले, असे बंडगार्डन पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
खिडकीतून उडी मारून केली आत्महत्या
"जेव्हा त्याला पकडण्यात आले, तेव्हा तो पुन्हा पुन्हा सांगत होता की त्याला आत्महत्या करायची आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला उपचारासाठी मानसोपचार वॉर्डमध्ये दाखल केले. आज सकाळी 5.30 च्या सुमारास, त्याने रुग्णालयाच्या 10 व्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
नातेवाईकांचा शोध सुरू
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाची माहिती शोधली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.