जेएनएन, पुणे. Pune News : पुण्यात एका पोलिस अधिकाऱ्याने अनेक आपल्या गाडीने अनेक लोकांना धडक मारली आहे. (Pune Cop Car Accident). या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी पोलीस अधिकारी दारूच्या नशेत होता. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील रांजणगाव येथे हा अपघात घडला. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव हेमंत इनाम असे आहे. हेमंतने अचानक त्याच्या कारवरील नियंत्रण गमावले आणि त्याने दोन दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना धडक दिली.
लोकांनी भररस्त्यात चांगलेच चोपले -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत आपली ड्युटी संपवून घरी जात होता. त्यावेळी तो पोलिसाच्या वर्दीत नव्हता. अपघातानंतर लोकांनी त्याला गाडीतून बाहेर काढले तेव्हा तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या अपघातात एका कॉन्स्टेबलसह सहा जण जखमी झाले आहेत. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक अहवालांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलिस अधिकाऱ्याकडून रक्ताचा नमुना घेण्यात आला आहे आणि तो चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.