एजन्सी, पुणे. Pune Hinjewadi Bus Accident: पुण्यातील हिंजवडी परिसरात सोमवारी संध्याकाळी बस फुटपाथवर चढल्याने झालेल्या अपघातात 6 वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या 8 वर्षांच्या बहिणीचा मृत्यू झाला तर दोघांच्या धाकट्या बहिणीसह तिघे जण जखमी झाले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

मद्यधुंद अवस्थेत चालकाला अटक

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी संध्याकाळी एका खाजगी कंपनीची बस एका फूटपाथवर आली आणि शाळेतून परतणाऱ्या तीन भावंडांसह पाच पादचाऱ्यांना धडक दिली, असे त्यांनी सांगितले.

बहिण-भावाचा मृत्यू

"6 वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या 8 वर्षांच्या बहिणीचा मृत्यू झाला, तर त्यांच्या धाकट्या बहिणीला गंभीर दुखापत झाली. इतर दोन पादचारीही जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.