एजन्सी, पुणे: पुणे शहरातील एका लाकूड बाजाराला बुधवारी पहाटे भीषण आग लागली, ज्यामध्ये 50 ते 60 दुकानांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
जय वल्लभ शाळेजवळील लाकूड बाजार परिसरात, जिथे अनेक लाकडाची दुकाने आहेत, तेथे पहाटे 2.05 वाजता ही आग लागली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत 50 ते 60 दुकानांचे नुकसान झाले आहे.
पुणे कँटोन्मेंटचा एक आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) दोन बंब यांसह तब्बल २७ अग्निशमन दलाच्या गाड्या, सुमारे 10 अग्निशमन अधिकारी आणि 150 जवानांसह तैनात करण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
#WATCH महाराष्ट्र: पुणे के टिम्बर मार्केट में जय वल्लभ स्कूल के पास लकड़ी के सामान की दुकानों में सुबह-सुबह करीब 2:05 बजे भीषण आग लग गई। किसी के हताहत होने या घायल होने की कोई खबर नहीं है। आग बुझाने के लिए कुल 27 दमकल गाड़ियां (पुणे फायर ब्रिगेड से 24, पुणे छावनी से 1, और पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (PMRDA) से 2) और लगभग 150 कर्मी तैनात किए गए थे। आसपास के रिहायशी इलाकों को बचाने के लिए चारों तरफ से करीब दो घंटे तक मशक्कत करने के बाद आग पर काबू पा लिया गया। फिलहाल कूलिंग ऑपरेशन चल रहा है और आग लगने के कारणों का अभी पता नहीं चल पाया है। (सोर्स: पुणे फायर ब्रिगेड)
— ANI_HindiNews (@AHindinews) November 18, 2026
जवळच्या निवासी परिसरात आगीच्या ज्वाळा पसरू नयेत म्हणून बाजाराच्या सर्व बाजूंनी अग्निशमन मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, सध्या कुलिंग ऑपरेशन (थंड करण्याची प्रक्रिया) सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
