जेएनएन, पुणे: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, समाजवादी नेते, युवक क्रांती दल (युक्रांद)चे संस्थापक आणि माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी (18 जुलै) निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांनी उभारलेला सामाजिक संघर्षाचा वारसा आणि गांधीवादी विचारांची समृद्ध परंपरा कायम राहणार आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सन 1967 मध्ये त्यांनी युवक क्रांती दल (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थी चळवळींपासून ते विविध जनआंदोलनांपर्यंत त्यांनी सक्रिय नेतृत्व केले. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अहिंसक आंदोलनांचा मार्ग स्वीकारत लोकशाही पद्धतीने आवाज उठवला.
डॉ. सप्तर्षी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीशी दीर्घकाळ संबंधित होते. ग्रामीण विकास, सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण आणि शांततामय समाजव्यवस्थेसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत 2025 मध्ये त्यांना 'बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.
हेही वाचा: उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक निर्णय; शिंदे गटात गेलेल्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांची मंजुरी
