जेएनएन, पुणे: सोलापूर-पुणे महामार्गावर सावतणे-मोडनिंब परिसरात जीप आणि कंटेनरची भीषण धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
कंटेनरला पाठीमागून कारची जोरदार धडक
सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळील सापटणे हद्दीत कंटेनरला पाठीमागून कारने जोरदार धडक दिल्याने एचपी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत मोहोळ येथील कर्ण पवार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
एकाचा मृत्यू
या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने जीप बाहेर काढण्यात आली. त्यानंतर कारचे दरवाजे तोडून तिन्ही जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेतील तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत.
वाहतूक कोंडी
अपघातातमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवले आणि वाहनांना रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
