जेएनएन, पुणे. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये काल झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली.

पोलिसांनी दिली सलामी

अजित पवारांना अखेरची मानवंदना आज बारामतीत नेण्यात आली. यावेळी पोलिसांनी हवेत तीन राऊंड फायर करत अखेरची सलामी दिली. पार्थ आणि जय यांनी सर्व अंत्यविधी केले.

मान्यवरांची उपस्थिती

अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थीत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी "अजित दादा अमर रहे" आणि "अजित दादा परत या" अशा घोषणा दिल्या. 

    अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू

    बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लँडिंग करताना बुधवारी सकाळी 8 वाजून 43 मिनीटांनी कोसळले होते. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला.