जेएनएन, पुणे: बहुचर्चित पूजा खेडकर प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. आरोपी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पोलिसांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोबतच मनोरमा आरोपीला पळून जाण्यास मदत आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

मनोरमा खेडकर यांचा ठिकाणा सापडला नाही

या प्रकरणी पोलिसांनी खेडकर यांच्या घरी धाड टाकली. घरातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, पोलिसांना अद्याप मनोरमा खेडकर यांचा ठिकाणा सापडला नाही. पोलिसांकडून खेडकरचा शोध घेण्यासाठी विशेष पथक केले आहे. दरम्यान विशेष पथक सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत आहे. 

काही महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या माहितीनुसार, पूजा खेडकरविरुद्ध असलेले काही महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईमध्ये थेट मनोरमा खेडकर यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पूजा खेडेकर यांच्यावर 2022 UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. तथापि, पूजा खेडेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

    UPSC ने बनावट ओळखीच्या आधारावर नागरी सेवा परीक्षेत बसल्याच्या आरोपाखाली खेडेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह अनेक कारवाया केल्या आहेत. दिल्ली पोलिसांनीही माजी आयएएस प्रोबेशनर विरोधात विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल केला आहे.