पुणे - (पीटीआय) -Pune news : काही दहशतवादी पुण्यात घुसले असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

"कट्टरपंथी लोकांबद्दल" मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, बुधवारी रात्री उशिरापासून कोंढवा परिसरात आणि पुणे शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शोधमोहीम सुरू होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एटीएसकडून व्यक्तींची पडताळणी सुरू आहे, असे ते म्हणाले, शोधमोहिमेची व्याप्ती वाढू शकते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस आणि पुणे पोलिसांच्या पथकांनी कोंढवा परिसरात शोध मोहीम राबवली.

मध्यरात्रीपासून कोंढवाच्या काही भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

काही संशयितांच्या हालचालींवर गुप्तचर विभागाने नजर ठेवली होती. या माहितीच्या आधारेच एटीएसने मध्यरात्री अचानक कारवाईचा निर्णय घेतला. सध्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.