जेएनएन, मुंबई. आज सकाळी बारामतीहून धक्कादायक बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान सकाळी 8:45 वाजता कोसळले. लँडिंग दरम्यान विमानाला आग लागली. या अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला. बारामतीत विमानाच्या लॅंडिगदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे. अजित पवारांचे विमान चालणारे पायलट नेमके कोण? त्यांना अनुभव किती होता असे प्रश्न समोर येत आहेत. 

अजित पवार यांच्या विमानाने मुंबईतून उड्डाण घेतलं होतं. हे विमान बारामतीत जाणार होतं. तिथे त्यांच्या आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभा होत्या. या कार्यक्रमासाठी अजित पवार पहाटे मुंबईतून निघाले होते. मात्र, बारामतीत विमानाच्या लॅंडिग दरम्यान हा अपघात घडला.

अपघातात सहा जणांचा मृत्यू

अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते VSR ऑपरेटरचे लिअरजेट-45 प्रकारचे विमान होते. विमानात अजित पवारांबरोबर एक पीएसओ आणि एक अटेंडंट उपस्थित होते. याशिवाय विमान चालवणारे दोन वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर आणि कॅप्टन शाभंवी पाठक यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला? 

या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यातून या अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते आहे. अपघातानंतर विमान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. दरम्यान, हे विमान क्रॅश लँडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाले की विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.