मुंबई. Ajit Pawar Plane Accident: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (DGCA (Directorate General of Civil Aviation)) प्राथमिक अहवाल आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अहवालातून अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

ब्लॅक बॉक्स तपासाचा अहवाल निर्णायक!

अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ताब्यात घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. या उपकरणांमध्ये विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती तसेच वैमानिक आणि कॉकपीटमधील संभाषणाची संपूर्ण नोंद असते.

तपास यंत्रणांनी या डेटाचे डीकोडिंग पूर्ण केल्याची माहिती मिळत आहे.अहवालात वैमानिकांनी अपघातापूर्वी कोणती परिस्थिती हाताळली याचा तपशील येण्याची शक्यता आहे.

अपघातामागील शक्य कारणांचा शोध-

DGCAकडून खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे —

    • तांत्रिक बिघाड होता का?

    • हवामान परिस्थितीचा परिणाम झाला का?

    • मानवी चूक किंवा ऑपरेशनल त्रुटी?

    • विमान देखभाल प्रक्रियेत त्रुटी होत्या का?

    • घातपात किंवा गुन्हेगारी कटाची शक्यता आहे काय 

    या सर्व बाबींची समांतर चौकशी सुरू असल्याचे अधिकृत माहिती समोर आली आहे.

    विमान कंपनीवरही तपासाची नजर-

    अपघातानंतर संबंधित चार्टर विमान कंपनीच्या ऑपरेशन, मेंटेनन्स रेकॉर्ड आणि सुरक्षा मानकांची तपासणी करण्यात आली आहे. DGCAने काही कागदपत्रे आणि तांत्रिक नोंदी जप्त करून त्यांचा अभ्यास केला आहे.

    राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर लक्ष-

    या अपघातानंतर राज्यात राजकीय वातावरणही तापले होते. पारदर्शक चौकशीची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यामुळे DGCAचा अहवाल हा केवळ तांत्रिकच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे.

    प्राथमिक अहवालानंतर —

    • सविस्तर अंतिम अहवाल जाहीर होईल

    • जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता

    • नियमभंग आढळल्यास कारवाई संभव आहे. 

    दरम्यान, ब्लॅक बॉक्समधील कॉकपीट संभाषण सार्वजनिक केले जाणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत अहवाल जाहीर झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.