सोलापूर. महाराष्ट्रात विमान दुर्घटनांच्या घटनांमध्ये सातत्याने समोर येत असताना सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाणासाठी सज्ज असलेल्या शिकाऊ विमानाला उड्डाणापूर्वीच अपघात झाल्याने विमानतळ परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेत महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केले आहे.
गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विमान अपघातांच्या घटनांनी हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. विशेषतः 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विमान वाहतुकीतील सुरक्षितता, विमानांची तांत्रिक तपासणी आणि विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली होती.
#WATCH | Maharashtra | A trainer aircraft skidded off the runway while landing at Solapur Airport. A female trainee pilot was on board and escaped unhurt. Fire and police personnel rushed to the spot: Airport officials https://t.co/Oh8X8Ps1ve
— ANI (@ANI) November 12, 2026
उड्डाणापूर्वीच विमानाला अपघात
सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमान उड्डाणासाठी तयार असताना हा प्रकार घडल्याचे समजते. विमानाशी संबंधित काहीतरी अनपेक्षित घटना घडल्याने अपघाताची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी विमानात महिला वैमानिक असल्याची माहिती आहे. सुदैवाने तिचा जीव वाचला. घटनेनंतर धावपट्टीवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न केले.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पुन्हा सुरक्षेचा प्रश्न-
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील विमानतळांच्या पायाभूत सुविधा, विमानांची देखभाल, वैमानिकांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक तपासणी या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. बारामती येथेही मे महिन्यात शिकाऊ विमानाला अपघात झाला होता, तर ऑगस्टमध्ये प्रशिक्षणादरम्यान आणखी एका विमानाने धावपट्टी सोडल्याची घटना घडली होती.
सोलापुरातील या ताज्या घटनेमुळे शिकाऊ विमानांच्या प्रशिक्षणादरम्यान घेतल्या जाणाऱ्या खबरदारीचा आणि विमानांच्या तांत्रिक स्थितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.
