जेएनएन, पुणे: नाशिक हाय-स्पीड रेल्वे प्रोजेक्टबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकल्पाचा पूर्वी निश्चित करण्यात आलेला नारायणगाव मार्गे जाणारा जुना कॉरिडॉर रद्द करण्यात आला आहे अशी माहिती दिली आहे.
जगप्रसिद्ध जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) जवळून हा मार्ग जात असल्याने विज्ञान व अणुऊर्जा विभागाने गंभीर हरकती नोंदविले होते.रेडिओ दुर्बिणीसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या परिसरातून हाय-स्पीड रेल्वे गेल्यास रेडिओ लहरींमध्ये मोठा व्यत्यय निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता. GMRT हे 31 देशांतील वैज्ञानिक वापरतात आणि त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी जुना मार्ग पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे मंत्री यांनी दिली आहे.
नवीन मार्ग निश्चित, प्रोजेक्ट पुन्हा सुरू होणार
रेल्वे मंत्रालयाने हाय-स्पीड कॉरिडॉरसाठी नवीन मार्ग अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानुसार प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन सुरू आहे. उपलब्ध अंतर्गत माहितीनुसार, या मार्गावर 24 स्थानके, 48 बोगदे, आणि उच्च क्षमतेची हाय-स्पीड ट्रेन अशी रचना करण्यात आल्याने. ट्रेनला 200 किमी प्रतितास वेगाने धावल्यानुसार डिझाइन करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
8,900 कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट
पुणे नाशिक हायस्पीड प्रोजेक्टवर 8,900 कोटी रुपय खर्च होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर केवळ काही तासांवर येणार आहे.मालवाहतूक, पर्यटन, उद्योग आणि कामगार प्रवासासाठी हा मोठा बदल ठरणार आहे.
DPR मंजुरीची प्रक्रिया
मार्गबदलानंतर प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे.केंद्र सरकारची अंतिम मंजुरीनंतरच निधी देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
हेही वाचा: राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी केंद्राकडे प्रस्ताव; तर भाजप खासदारांची मोदींसोबत आज बैठक
हेही वाचा: Pune Land Scam: पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची आज कोर्टात पेशी, दिग्विजय पाटीलची 5 डिसेंबरला चौकशी
