जेएनएन, मुंबई:राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी केंद्राकडे मदतीसाठी राज्य सरकारने आधीच  प्रस्ताव पाठविला आहे.मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांनी याबाबतची माहिती दिली आहे.राज्य सरकारकडून प्रस्ताव गेल्यानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात पाहणी झाली आहे.


आज शेतकऱ्यांच्या  मदतीचा प्रस्ताववर दिल्लीत बैठक होणार आहे. बैठकीत राज्यातील शेतकरी आज मदत जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बोलविली बैठक आहे.सकाळी साडे दहा वाजता ही बैठक होणार आहे.

संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही बैठक होणार आहे.बैठक बैठकीला राज्यसभा आणि लोकसभाचे भाजप खासदार उपस्थित राहणार आहे.यामध्ये राज्यसभेतून धनंजय महाडीक,अनिल बोंडे, भागवत कराड,अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, धैर्यशील पाटील, उज्ज्वल निकम तर लोकसभेतून नितीन गडकरी, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे, स्मिता वाघ, पियुष गोयल उपस्थित राहणार आहे.  पंतप्रधानांच्या बैठकीपूर्वी पियुष गोयल यांच्या कार्यालयात महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक होणार आहे.त्यानंतर पियुष गोयल यांच्या सोबत सर्व खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार आहे.

हेही वाचा:Pune Land Scam: पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची आज कोर्टात पेशी, दिग्विजय पाटीलची 5 डिसेंबरला चौकशी

हेही वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवलाच नाही? केंद्र–राज्य संवादात तफावत, राज्याच्या कृषीमंत्र्यांकडून स्पष्टीकरण