जेएनएन, नाशिक: भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरातविरुद्ध दाखल तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपत असून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याला न्यायालयासमोर उभे केले जाईल. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात तपास यंत्रणांकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला असून, अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. आर्थिक गैरव्यवहार, बनावट ओळख आणि लोकांची फसवणूक या संदर्भात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम(SIT) च्या ठिकाणात तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला नाशिक शहर पोलीस मुख्यालयातील हिमांशु क्लब येथून तपास सुरू झाला होता. त्यानंतर एसआयटीचा मुक्काम महाराष्ट्र Policeपोलीस अकॅडमी येथे हलवण्यात आला होता.
आता पुन्हा एकदा बदल करत एसआयटीचे कामकाज विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्रातून चालवले जाणार आहे. वारंवार ठिकाण बदलण्यामागे तपासाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्याचा उद्देश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर तपासाची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: ‘माझं मरण इथेच’, अशोक खरातची प्रतिक्रिया; नागपुरातील महिलेला घातला 2.5 कोटींचा गंडा
