जेएनएन, नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अशोक खरात याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (अंमलबजावणी संचालनालय - ED) मोठी कारवाई केली आहे. तब्बल 16 तासांहून अधिक काळ कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

‘तृप्तबाला’ घरावर छापा! 

खरातच्या ‘तृप्तबाला’ या आलिशान घरावर ईडीने छापा टाकत सखोल तपास सुरू केला. या कारवाईदरम्यान संशयित आर्थिक व्यवहारांशी संबंधित 100 हून अधिक दस्तऐवजांची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

मर्सिडीज गाडी सील

ईडीने कारवाईदरम्यान खरातची आलिशान Mercedes-Benz गाडी देखील जप्त करून सील केली आहे. या गाडीचा वापर कथित आर्थिक व्यवहारांमध्ये झाला का, याचीही चौकशी सुरू आहे.

11 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी

    या प्रकरणात ईडीने मोठा सर्च ऑपरेशन राबवत खरात आणि त्याच्याशी संबंधित एकूण 11 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

    प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी

    दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित म्हणून प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास चाललेल्या चौकशीत समता पतसंस्थेतील व्यवहारांवर भर देण्यात आला.

    2 कोटी 40 लाखांच्या व्यवहाराचा तपास

    समता पतसंस्थेतील खात्यांमधून 2 कोटी 40 लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत चौकशी झाली.

    • प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन खाते
    • त्यांच्या मुलाच्या नावावरही दोन खाते असल्याची माहिती
    • या खात्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचा संशय

    “मी खाते उघडलेच नाही” – चाकणकरांचा दावा 

    चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी गंभीर दावा करत सांगितले की, “देवदर्शनाच्या नावाखाली कल्पना खरात यांनी कागदपत्र घेतली होती. ही खाती मी स्वतः उघडलेली नाहीत.” या दाव्यानंतर तपास अधिक गुंतागुंतीचा झाला असून, कागदपत्रांचा गैरवापर झाला का, याचा तपास पोलिस करत आहेत.