एजन्सी, नागपूर: हवामान विभागाने महाराष्ट्राच्या विदर्भातील काही भागांसाठी येलो अलर्ट (Yellow alert in Vidarbha) जारी केला आहे. पुढील काही दिवसांत वादळ आणि विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
नैऋत्य मान्सून 10 ऑक्टोबरच्या सुमारास या प्रदेशातून माघार घेण्यास सुरुवात करेल, असे त्यांनी सांगितले.
नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारपासून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, गडगडाटी वादळे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूरमधील प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार म्हणाले की, पुढील तीन दिवस विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
9 किंवा 10 ऑक्टोबरपासून पावसाची तीव्रता वाढण्याचीची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
विदर्भातून नैऋत्य मान्सून परतण्याची सामान्य तारीख 10 ऑक्टोबरच्या आसपास असते आणि हवामानशास्त्रीय सामान्यतेनुसार संपूर्ण प्रदेशातून साधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे परतीचा प्रवास होतो, असे अधिकाऱ्याने सांगितले.